आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्या अंध खेळाडूंना प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस- क्रीडामंत्री विजय गोयल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट संघातील प्रत्येक सदस्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी घोषणा क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली. क्रीडामंत्री म्हणाले, ‘आम्हाला कसलाच वाद नकोय. 
 
आम्हाला या खेळाडूंना प्रोत्साहित करायचे आहे. यामुळे सरकारने या अंध विश्वचषक विजेत्या खेळाडूंना मागच्या वेळेप्रमाणेच या वेळीही प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे ठरवले आहे.’ क्रीडामंत्री विजय गोयल यांनी अंधांच्या क्रिकेट संघाला सन्मानित करण्यासाठी आपल्या निवासस्थानी बोलावले होते. मागच्या  वेळी मिळालेल्या बक्षीस रकमेचा पुरावा मागितल्याबद्दल या वेळी वाद निर्माण झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...