आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहली: म्‘क्षमतेवर प्रश्न निर्माण व्हायचे, मी मात्र नंबर वन बनण्यात गुंतलो...’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - माझ्या क्षमतेवर नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण केले जायचे. मात्र, माझा स्वत:वर भरवसा होता. यामुळे मी नंबर वन, सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून पुढे येऊ शकलो, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले. भारताच्या तिन्ही संघाचा कर्णधार विराट कोहली पहिला असा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने तीन वेळा पॉली उम्रीगर अवाॅर्ड जिंकला.  

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मला आधीपासून जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू व्हायचे होते आणि मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोरदार मेहनत करू लागलो, असे कोहलीने म्हटले.   
 
मागचे वर्ष महत्त्वपूर्ण : माझ्यासाठी २०१५ च्या अखेरपासून ते २०१६ च्या शेवटपर्यंतचा काळ कमालीचा ठरला. हा काळ माझ्या करिअरमधील सर्वोत्तम काळ होता. मी माझ्या खेळासाठी जी मेहनत, ट्रेनिंग केली, जे काही बलिदान दिले, त्याचा फायदा मला झाला. मात्र, हे सर्व माझ्या संघ सहकाऱ्यांशिवाय शक्य नव्हते, असे कोहलीने म्हटले.   
 
जगाची चिंता नाही :  बाहेरचे जग काय म्हणते, कोण आमच्यावर टीका करत आहे, याची चिंता खेळाडू करत नाहीत. यामुळे आमच्यावरील दबाव कमी होण्यास मदत झाली, असेही कर्णधाराने सांगितले. मला कर्णधार केल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो, असेही कोहलीने म्हटले.
 
संघातील सहकारी सर्वोत्तम
बरेचदा माझे प्रदर्शन चांगले झाले नाही. मात्र, संघात चॅम्पियन खेळाडूंची कमी नाही. या खेळाडूंनी योग्य वेळी संघाला सावरले आणि संघाला पुढे नेण्यात योगदान दिले, असे कोहलीने म्हटले. आम्ही एकसंघ म्हणून खेळत असतो. यामुळेच आज आम्ही जगात नंबर वन टीम आहोत. हे यश खेळाडूंमुळेच मिळाले. वेगवेगळ्या परिस्थितीत खेळाडूंनी पुढे येऊन योगदान दिले.  मी हे समर्थन आणि आपल्या संघाचे आभार मानतो, असेही त्याने नमूद केले. 
 
स्मिथप्रकरणी आयसीसीची बाजू चुकलीच : गावसकर
नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूत झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीन्हन स्मिथने डीआरएसला (डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम) “ड्रेसिंग रूम सिस्टिम’ बनवल्यामुळे नव्या वादाची सुरुवात झाली. बीसीसीआयसह अनेक क्रिकेटपटूंनी स्मिथवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अायसीसीने स्टीव्हन स्मिथ आणि विराट कोहली या दोघांवर कसलीच कारवाई करणार नसल्याचे सांगितले. स्मिथ प्रकरणात आयसीसीने चुकीचा पायंडा पाडला, अशी टीका माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केली आहे.   
 
डीआरएस रेफ्रलसाठी ड्रेसिंग रूमकडे इशारा मागणे नियमाच्या विरुद्ध आहे, असे गावसकर यांनी म्हटले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने डीआरएससाठी ड्रेसिंग रूमकडे मदत मागितली असती तर माग काय घडले असते? असेही गावसकर यांनी विचारले. स्मिथ प्रकरणी आयसीसी चुकलेच असेही ते म्हणाले.
 
‘अम्पायर कॉल’ आहे डीअारएसची वादग्रस्त बाजू  
बंगळुरू कसोटीच्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने डीआरएससाठी ड्रेसिंग रूमकडे इशारा केल्याचा वाद चांगलाच भडकला आहे. या प्रकरणात पंचांची बाजू पूर्णपणे दुर्लक्षित झाली आहे. पंच निर्णय समीक्षा पद्धती (डीआरएस) प्रक्रियेमध्ये पंचांची बाजू हा सर्वात मोठा वादग्रस्त पैलू आहे. 
 
प्रकरण १ : कोहली बाद 
दुसऱ्या डावात कोहली हेझलवूडच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. कोहलीने लगेचच डीआरएसची मागणी केली. चेंडू आधी बॅटला आणि नंतर पॅडला लागल्याची त्याला खात्री होती. तिसऱ्यां पचांंनी बरेच रिप्ले पाहिल्यानंतर मैदानी पंचाचा निर्णय कायम ठेवला.
 
प्रकरण २ : मार्श नाबाद 
जडेजाचा एक चेंडू आत आला आणि मिशेल मार्शच्या पॅडला लागला. पंचांनी त्याला नाबाद दिले. भारताने डीआरएस मागितले. रिप्लेत चेंडूचा योग्य होता हे स्पष्ट होत होते. चेंडू यष्टीला लागत होता. मार्श बाद असल्याचे दिसत होते. तरीही पंचांनी त्याला नाबाद ठरवले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...