आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या सहभागाविषयी अायसीसीकडे सूर, आता “स्टार इंडिया’नेही अायसीसीकडे केली विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुरस्कर्त्यांची वानवा असतानाच इंग्लंडमध्ये येत्या १ जूनपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या सहभागाविषयीच्या अनिश्चिततेमुळे “स्टार इंडिया’मध्ये अनिश्चितता आणि काळजीचे वातावरण पसरले आहे. तीन आठवड्यांवर स्पर्धा येऊन ठेपली असताना आता स्टार इंडियानेच आयसीसीकडे भारताच्या सहभागाविषयी निश्चित असे कळविण्याचे सूचित केले आहे. 

भारताचा आर्थिक हिस्सा आयसीसीने कमी केल्यामुळे बीसीसीआयने सदस्य राष्ट्रांच्या सहभागाविषयीच्या कराराच्या आधारे आपला बहिष्काराचा हक्क बजावण्याची धमकी दिली होती. त्यानंतर “स्टार इंडिया’ या भारतीय उपखंडातील प्रक्षेपण वाहिनीच्या जाहिरातींद्वारे होणाऱ्या मिळकतीवर परिणामाची शक्यता निर्माण झाली. स्टार इंडियाने २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीसाठी आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क घेतले आहेत.
 
त्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचाही समावेश आहे. क्रिकेटचे मार्केट भारतात मोठे असल्यामुळे या स्पर्धेसाठी सामन्यांच्या वेळी जाहिराती करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी सध्या वाट पाहण्याचे ठरविले आहे. भारताने सहभाग काढून घेतल्यास “स्टार इंडिया’च्या हातून भारतात मोठे मार्केट असलेले ब्रँणड्स निसटण्याची शक्यता आहे. हा धोका फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपुरताच मर्यादित नाही. कारण भारताने करार रद्द केल्यास भारतीय संघाच्या २०२३ पर्यंतच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. म्हणजे २०१७ पासून २०२३ पर्यंतच्या पुढील सात वर्षांसाठीही “स्टार इंडिया’चे मार्केट दोलायमान राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीसीसीआयच्या डावपेचांना उत्तर देण्यासाठी  साऱ्या गोष्टी पूर्णपणे ज्ञात असलेल्या मनोहर यांना म्हणूनच  एकंदर अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसविले आहे.
 
सहभागाचे अधिकृत पत्रकाची केली मागणी
स्टार इंडियाने भारताच्या सहभागाविषयी आयसीसीने अधिकृत पत्रक काढावे, अशीही विनंती केल्याचे कळते. भारताच्या सहभागाविषयीची सर्वाधिक काळजी स्टार इंडियाला असणे स्वाभाविकच आहे. कारण भारतीय संघाचा सहभाग नसल्यास त्यांच्या मिळकतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आयसीसी व स्टार इंडियाचे बीसीसीआयच्या हालचालींवर बारकाईने लक्ष आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...