आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमभंगाने राहिली एकटी, अाता रिअाेत खेळणार- पाहा, तिचे थक्क करणारे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेल्सिया जाएंस्च - Divya Marathi
चेल्सिया जाएंस्च
अॅडिलेड- अाॅस्ट्रेलियाच्या चेल्सिया जाएंस्चचा प्रेमभंग झाला. या दु:खात पूर्णपणे बुडालेल्या चेल्सियाने घराबाहेरही पडणे बंद केले. ती पूर्णपणे एकटीच राहत हाेती. तिने अापल्या अाप्तेष्टांशी बाेलणेही बंद केले. अावश्यक असणाऱ्या वस्तूंची ती अाॅनलाइन मागणी करत असे. या प्रेमभंगाने तिचे मानसिक धैर्यही खचले हाेते. तिला गर्दीच्या ठिकाणाची माेठी भीती वाटू लागली. यातून अापल्याला सावरण्यासाठी तिने लांंब उडीचा सराव सुरू केला. यातून तिच्या मनातला ‘क्राऊड फाेबिया’ दूर झाला. अाता तर तिने अागामी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला अाहे. अाता चेल्सिया या विषयी सांगते की, ‘‘तीन वर्षांपूर्वी माझा प्रेमभंग झाला हाेता. मी क्वीन्सलँडमध्ये राहत हाेती. याठिकाणचे घर विकुन मी अॅडीलेडला अाले. याठिकाणी भाड्याच्या घरात राहु लागली. मी नाेकरी सुरु केली. मात्र,प्रेमभंग झाल्यानंतर मी अधिकच निराश झाली. या जुन्या अाठवणींना उजाळा नकाे, म्हणुन मी तासन तास अाॅफिसमध्ये थांबून काम करत असे.
यातुनच मी लाेंकाशी भेटणेही बंद केले हाेते. अापल्या संबंधावर उगीचच चर्चा हाेऊ नये, यासाठीच मी प्रयत्न करत असे. यातुनच माझ्यात एकलकाेंडेपणा अाला हाेता. मात्र, अाता हा एकाकीपणा दुर करण्यासाठी मी धडपडू लागली.कारण, याचा मला अधिकच त्रास जाणवू लागला. एकाग्रता वाढवण्यासाठी खेळाचा अधिक फायदा हाेताे, हे मला माहित हाेते. यातुनच मग मी लांब उडीचा सराव सुरु केला. माझ्या मनातली भिती दुर झाली. मी या खेळात तरबेज झाली. निवड चाचणीत सहभागी झाल्यानंतर मला राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले. या स्पर्धेत मी सहावे स्थान गाठले. त्यानंतर १८महिन्यांचा सराव केला. दरम्यान रिअाेच्या पात्रता फेरीत मला उल्लेखनिय कामगिरी करता अाली. अाता अाॅलिम्पिकमध्ये अव्वल कामगिरी करण्याचा मला विश्वास अाहे.
पाहा तिच्या थक्क करणाऱ्या Jump
बातम्या आणखी आहेत...