आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स याचिकेवर आज सुनावणी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) संघांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. या दोन्ही संघांवरील दोन वर्षांच्या बंदीविरुद्ध भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. स्वामी यांनी आयपीएलच्या दोन्ही टीमवरील निलंबनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. तसेच या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोपही त्यांनी माजी आयुक्त ललित मोदी यांच्यावर लावला आहे.
सर्वसामान्य जनता आणि क्रिकेटचे हितसंबंध जोपासण्यासाठी चेन्नई आणि राजस्थान राॅयल्सवर लावलेल्या बंदीच्या निर्णयाला स्थगिती दिली जावी, असे त्यांनी याचिकेत म्हटले. मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल आणि टी. एस. शिवागनानम यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना २३ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली हाेती.