आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हितासाठी सरसावल्याने कुंबळेवर खप्पामर्जी, मानधन वाढीमुळे कुरापती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणजी पातळीवर खेळणाऱ्या देशातील हजारो क्रिकेटपटूंची आणि कसोटी व प्रथम दर्जाचे भारतासाठी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची बाजू मांडल्याचा राग  विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर सध्या काढण्यात येत असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर नव्या प्रशिक्षक निवडीच्या रांगेत त्यांनाही उभे राहावे लागणार आहे. बीसीसीआयने सूडबुद्धीने केलेल्या या कृतीची दखल लोढा समितीने घेतली असून समितीचे सचिव गोपाळ शंकरनारायण यांनी त्याबाबत बीसीसीआयला फटकारले आहे.

इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीबरोबरच कुंबळेचा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात येणार आहे. भारतीय संघासाठी यशस्वी प्रशिक्षक म्हणून सिद्ध झालेल्या कुंबळेच्या या कराराचे नूतनीकरण करण्याऐवजी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षक निवडीची जाहिरात प्रसिद्ध केली. ३१ मे ही मुलाखतीसाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारतातील तब्बल चार कसोटी मालिका आणि बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी जिंकणाऱ्या भारतीय संघाला अनील कुंबळे यांनी प्रशिक्षण दिले होते.
 
गोपाळ शंकरनारायण यांनी बीसीसीआयच्या या कृतीवर टीका करताना म्हटले आहे की, देशाच्या संघाला यशस्वी करणाऱ्या प्रशिक्षकाला अशी वागणूक देणे योग्य नव्हे. 
 
मानधन वाढीमुळे कुरापती 
कुंबळे यांची मंडळाच्या सदस्यांबरोबरची जवळीक आणि क्रिकेटपटूंचे मानधन वाढावे यासाठी सूत्रबद्ध केलेले सादरीकरण यामुळे बीसीसीआयमधील काही मंडळी दुखावली गेली असल्याचे कळते. खेळाडूंना  दैनंदिन भत्त्याच्या पाचपट भत्ता संघासोबत जाणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात येतो, ही बाबही उघड झाल्यामुळे मंडळातील सदस्य नाराज झाले होते. व्यवस्थेच्या साफसफाई मोहिमेला अजूनही अडथळे आणले जात असल्याचे लक्षात आल्यामुळे लोढा समितीच्या सचिवांनी कुंबळे यांच्याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेची दखल घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...