आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माे. कैफने संघासाेबत साेडले मैदान, पंचांच्या निर्णयावर नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - भारतीय संघाचा माजी खेळाडू माेहंमद कैफ  वादाच्या भाेवऱ्यात सापडला अाहे. त्याने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर अापली नाराजी व्यक्त केली. यानंतर रागाच्या भरात अापल्या संघासाेबत तो मैदानाबाहेरही गेला. काेलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठाच्या मैदानावर छत्तीसगड अाणि कर्नाटक यांच्यात सामना झाला.  दरम्यान ही घटना घडली. मात्र, पंचांनी वेळीच मध्यस्थी करून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला. त्यानंतर कर्णधार कैफ अाणि छत्तीसगडचे खेळाडू मैदानावर परतले. 

या निर्णयावर नाराजी : सामन्यादरम्यान कर्नाटकचा फलंदाज मयंक अग्रवालच्या बॅटला लागलेल्या चेंडूचा झेल थेट यष्टिरक्षकाच्या हातात गेला. त्यानंतर कर्णधार कैफने बादसाठी अपील केली. मात्र, पंच वीरेंद्र शर्मा यांनी अापल्या सहकारी पंच उमेश दुबेसाेबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मयंक अग्रवाल नाबाद असल्याचा निर्णय दिला. या निर्णयावर अापण असमाधानी असल्याचे कैफ म्हणाला. त्यामुळे त्याने थर्ड अम्पायरची मदत मागितली. मात्र, त्याची ही मागणी फेटाळण्यात अाली. यामुळे नाराज झालेल्या कैफने संघासह मैदान सोडले.
 
मो. कैफला फटकारले 
पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून मैदान साेडल्या प्रकरणी सामनाधिकारी नितिन गोयल यांनी कैफला फटकारले. याशिवाय त्याच्या सामनेनिधीतून रक्कम कपातीचा निर्णय घेताना त्याला दंडीत करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...