आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहलने क्रिकेटच नव्हे, तर बुद्धिबळातही केले देशाचे प्रतिनिधित्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तो भारताचा असा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने देशासाठी आधी इनडोअर खेळातही सहभाग घेतला. त्यानंतर तो आऊटडोअर खेळात सामील झाला...हा खेळाडू टीम इंडियाचा युवा लेगस्पिनर यजुवेंद्र चहल आहे. बालपणी आपल्या खेळातील करिअरची सुरुवात बुद्धिबळाने करणारा चहल आता भारताचा सर्वात चर्चेचा खेळाडू आहे. तो एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने क्रिकेटशिवाय बुद्धिबळातही भारताचे प्रतिनिधित्व केले. तो २००२ मध्ये अंडर-१२ गटात नॅशनल चेस चॅम्पियन होता. यानंतर आशियाई यूथ चॅम्पियनशिपमध्ये अंडर-१२ गटात आणि वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपमध्ये अंडर-१६ गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याचे नाव आजही वर्ल्ड चेस फेडरेशनच्या (फिडे) रेटिंग लिस्टमध्ये आहे.

चहलने संगणकाच्या मदतीने बुद्धिबळाचे डावपेच शिकले होते. बुद्धिबळासाठी त्याला दरवर्षी ५० लाख रुपयांची गरज पडायची. यासाठी तो प्रायोजक मिळवू शकला नाही. आर्थिक अडचणीमुळे बुद्धिबळ सोडून त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. बुद्धिबळामुळेच गोलंदाजी करताना फलंदाजाच्या डोक्यात काय सुरू आहे, हे मी ओळखू शकतो, असे तो म्हणतो.  

२३ जुलै १९९० रोजी जन्मलेला चहल हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील दरियावाल गावाचा रहिवासी आहे. चहलचे वडील वकील आहेत. तेसुद्धा विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले. चहलने २००९ मध्ये इंदूरमध्ये (म.प्र.) आपला पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळला. चहलने मध्यमगती गोलंदाज म्हणून करिअरची सुरुवात केली. आयपीएलमध्ये आपला पहिला सामना २०११ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला. आता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. चहलला बालपणापासून घरात खेळासाठी मदतीचे वातावरण मिळाले. त्याचे वडील के.के. चहल दरियावाली गावाचे सरपंच होते. वडिलांनी त्याच्यासाठी २००४ मध्ये दीड एकर शेतात खेळपट्टी बनवली. चहलने येथेच सराव केला. २०११ पर्यंत तो शेतात सराव करायचा. 

चहलने डीएफव्ही जिंदहून १२ वीचे शिक्षण घेतले. नंतर राजस्थानातून त्याने पदवी घेतली. तो सध्या केरळ विद्यापीठात डिस्टन्स एज्युकेशनमध्ये एमबीए करत आहे. चहल घरात सर्वात लहान आहे. त्याच्या दोन बहिणी असून त्या ऑस्ट्रेलियात राहतात. राजमा-भात चहलच्या आवडीचे पदार्थ असून लसणाची चटणीसुद्धा त्याला आवडते. तो आधी अंडी खात नव्हता. मात्र, कोचने त्याला स्नायूच्या अडचणी सांगून मांसाहारी बनवले.   

सहकाऱ्यांसोबत हास्यविनोद करणे चहलला आवडते. आपल्या आजूबाजूचे वातावरण प्रफुल्लित असले पाहिजे, असे त्याला वाटते. २०११ च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या वेळी मुंबई इंडियन्सचे त्याचे सहकारी सायमंड्स आणि अॅडन ब्लिझार्ड यांनी त्याला आइस टबमध्ये फेकले होते. त्या वेळी चहलला आइस टबबाबत माहिती नव्हते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क त्याचा खास मित्र आहे, तर महान गोलंदाज शेन वॉर्नला तो आपला अादर्श मानतो. चहल अभिनेत्री कॅटरिना कैफचा फॅन आहे. कॅटरिनाचे स्माइल मला वेड लावतेे, असे त्याने एकदा मुलाखतीत सांगितले होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...