आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने झारखंड क्रिकेट संघासोबत केला रेल्वेने प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंड क्रिकेट संघ विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी कोलकात्याला रवाना झाला. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसुद्धा झारखंडच्या खेळाडूंसोबत रेल्वेने कोलकात्याला गेला. धोनीने तब्बल १३ वर्षांनी रेल्वेने प्रवास केला.
 
धोनी हटिया स्टेशनलासुद्धा आपल्या रेंज रोव्हर किंवा हमरने नव्हे, तर साध्या बसने गेला. तो बसच्या पहिल्या सीटवर बसलेला होता. झारखंडचा सामना २५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकशी होईल.
 
१३ वर्षांनी रेल्वेने केला प्रवास, २५ फेब्रुवारीला कर्नाटकशी सामना
मी आधीसुद्धा अनेकदा जनरल बोगीने प्रवास केला आहे. मी खरगपूर येथे टीटीईची नोकरीसुद्धा केली आहे. अनेक वर्षांनी मी पुन्हा रेल्वेत बसलो आहे. प्रवासाचा पूर्ण आनंद घेतला.’ - धोनी
बातम्या आणखी आहेत...