आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरकीचा दणका : पहिल्या डावात भारत सर्वबाद 201, अाफ्रिका 2 बाद 28

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेहाली - फ्रिडम मालिकेच्या सलामी कसाेटीत फिरकी गाेलंदाजांनी अापले वर्चस्व गाजवले. त्याचा दाेन्ही टीमला दणका बसला. कसाेटीच्या पहिल्याच दिवशी काेहलीची सेना अापल्याच जाळ्यात अडकल्याचे चित्र निर्माण झाले. काेहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने स्काेअर बाेर्डवर सर्वांना माेठ्या धावसंख्येची अाशा हाेती. मात्र, यजमान टीमला २०१ धावांत पहिला डाव गुंडाळावा लागला. मुरली विजय (७५) वगळता भारताचे दिग्गज अपयशी ठरले.

पाहुण्या अाफ्रिका टीमसाठी रचलेल्या जाळ्यातच यजमान टीम पूर्णपणे अडकली. भारताच्या सात दिग्गजांना फिरकीपटूंनी तंबूत पाठवले. प्रत्युत्तरामध्ये अाफ्रिकेचीही निराशाजनक सुरुवात झाली. या टीमने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर गुरुवारी २ गड्यांच्या माेबदल्यात २८ धावा काढल्या. अाता मैदानावर डिन एल्गर (१३) अाणि कर्णधार हाशिम अामला (९) खेळत अाहेत.

टाॅस जिंकला, मन नाही
भारतीय संघाची ‘रन मशीन’ म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या विराट काेहलीने माेहाली कसाेटीत नाणेफेक जिंकून चाहत्यांना सुखद भेट दिली. मात्र, त्याला धावा काढण्यात सपशेल अपयशाला सामाेरे जावे लागले. अवघी एक धावा काढून ताे तंबूत परतला.

अश्विनचा धमाका
कर्णधार विराट काेहलीने पहिले षटक अार. अश्विनला टाकण्याचे संधी दिली. याच संधीचे साेने करताना अश्विनने संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्याने एस. वान. जिलची (५) विकेट घेऊन चाहत्यांना जल्लाेषाची संधी मिळवून दिली. अश्विनने सात षटकांत चार धावा देत एक गडी बाद केला. त्यापाठाेपाठ रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. त्याने फाफ डुप्लेसिसला भाेपळाही फाेडू दिला नाही.

अाफ्रिकेचा एल्गर ठरला घातक
दक्षिण अाफ्रिका टीमचा फिरकी गाेलंदाज एल्गर हाच टीम इंडियासाठी अधिक घातक ठरला. त्याने एकापाठाेपाठ एक असे भारताचे चार दिग्गज तंबूत पाठवण्याचा पराक्रम गाजवला. त्याने चेतेश्वर पुजारापासून अापल्या माेहिमेला सुरुवात केली. त्यानंतर त्याने सलग दाेन चेंडूंवर अजिंक्य रहाणे अाणि वृद्धिमान साहाला बाद केले. याच वेळी त्याने हॅट‌्ट्रिकची अाशा पल्लवित केली हाेती. मात्र, त्याची ही संधी हुकली.

पदार्पणात रबाडा चमकला
नाणेफेकीनंतर कर्णधार अामलाने अापल्या टीममध्ये माेर्कलच्या जागी रबाडाला सहभागी करून सर्वांना अाश्यर्चाचा धक्का दिला. मात्र, रबाडाने अापल्या पहिल्या चेंडूवर टीम इंडियाचा कर्णधार काेहलीची विकेट काढून अामलाचा विश्वास सार्थकी लावला. याशिवाय त्याने पदार्पणालाही चांगली सुरुवात केली.

अजिंक्य रहाणेकडून निराशा
भारतीय संघाची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. काेहलीपाठाेपाठ अजिंक्य रहाणेनेही घोर निराशा केली. त्यालाही माेठ्या धावसंख्येचा अाकडा पार करता अाला नाही. त्याने १५ धावा काढून तंबू गाठला. या वेळी रवींद्र जडेजाने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. याशिवाय अश्विनने २० धावा काढून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.