आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs NZ : न्यूझीलंडला पहिला झटका, यादवने गप्टिलला २१ धावांवर केले बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवींद्र जडेजाने नाबाद 42 धावांची खेळी केली. - Divya Marathi
रवींद्र जडेजाने नाबाद 42 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डावात उमेश यादवने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला आहे. मार्टिन गप्टिलला उमेशने 21 धावांवर पायचित केले. न्यूझीलंडला 35 धावांवर हा पहिला धक्का बसला.
दरम्यान, त्याआधी जडेजाने केलेल्या नाबाद 42 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचा पहिला डाव 318 धावांवर संपुष्टात आला. अश्विन आणि जडेजाने भारताचा डाव शेवटच्या टप्प्यात सावरला.
पहिल्या दिवशी भारताच्या राहुल आणि विजयने काहीशी चांगली सुरुवात केली. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर पुजारानेही जम बसवला. पण विजय आणि पुजारा अर्धशतकांनंतर बाद झाले. त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर भारताचा जाव ढेपाळत गेला. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धीराने सामना केला. पण तोही 35 धावांवर बाद झाला. तळाच्या अश्विनने जडेजाच्या साथीने भारताचा दाव सावरला. दुसऱ्या दिवशी. 318 धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला. अश्विनने 40 तर जडेजाने नाबाद 42 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या बाऊल्ट आणि सँटनर यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले तर वॅगनरने दोन आणि सोधी तसेच क्रेग यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत भारताचा डाव गुंडाळला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारताच्या पहिल्या डावातील काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...