आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलासुद्धा सेहवागप्रमाणे पहिल्या चेंडूवर षटकार मारायचा होता, मात्र केवळ एकदाच असे करू शकलो-गावसकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे  - मलासुद्धा नेहमी कसोटीच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची इच्छा व्हायची.  मात्र, मी असे केवळ एकदा करू शकलो. वीरेंद्र सेहवागने असे नियमितपणे केले. सेहवाग एक शानदार फलंदाज होता, तो खूप साहसिक फटके मारायचा, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केली. “सनी डेज’ या आपल्या पुस्तकाला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गावसकर बोलत होते.  
 
 सेहवाग भारतीय संघात आला तेव्हा मी पहिला असा सलामीवीर पाहिला जो पहिल्या चेंडूपासून प्रहार करायचा. सेहवागची फलंदाजी शैलीच वेगळी होती, असेही त्यांनी म्हटले. विराट कोहलीच्या नेतृत्वात आता टीम इंडिया शानदार प्रदर्शन करत आहे. आताचा भारतीय संघ माझ्या स्वप्नांची पूर्ती करत आहे. काेहली आणि त्याच्या संघाचे प्रदर्शन शानदार आहे. ही टीम जबरदस्त आहे, असेही त्यांनी म्हटले.  
 
 टी-२० क्रिकेटबाबत गावसकर म्हणाले, “टी-२० क्रिकेटने खेळात बराच चांगला बदल केला आहे. या खेळाने खेळाचे महत्त्व वाढवले आहे,’ असेही या वेळी गावसकर म्हणाले. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारे गावसकर जगातले पहिले फलंदाज होते. त्यांच्या नावे १२५ कसोटीत ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा असून यात ३४ शतकांचा समावेश आहे. सेहवागने सुद्धा कर्णधार गांगुलीच्या सल्ल्यानुसार सलामीला खेळण्याची तयारी दर्शवली. सेहवागने कसोटीत ४९.३४ च्या सरासरीने ८ हजारपेक्षा अधिक धावा काढल्या. यात त्याने २३ शतके ठोकली.   
 
अाता माझी टीम पुण्याला हरवू शकेल : वीरेंद्र सेहवाग  
अायपीएल टीम पुणेच्या कर्णधारपदावरून धोनीला दूर करण्यात आल्यानंतर हा निर्णय दु:खद आहे, असे सेहवाग म्हणाला. ‘धोनी आता कर्णधार नाही, याचा मला आनंद आहे. कारण आता माझी किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम पुण्याला हरवू शकेल. याबाबत गांभीर्याने बोलायचे ठरवले तर हा संघ मालकाचा निर्णय आहे. मात्र धोनी भारताच्या सर्वश्रेष्ट कर्णधारांपैकी एक आहे.’
बातम्या आणखी आहेत...