आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळिकीनंतरही मिळाली अाॅस्ट्रेलियाला क्लीन चिट, स्मिथवर कारवाई न करण्याचा अायसीसीचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सद््गृहस्थांचा खेळ असल्याचा सतत देखावा करणाऱ्या आणि स्वत: त्याच तत्त्वाला काळिमा लावून निसटणाऱ्या श्वेतवर्णीय क्रिकेटपटूंची आणखी एक अखिलाडू वृत्तीची कृती दुर्लक्षित केली गेली आहे. एक-दोनदा नव्हे, तर चक्क तीन वेळा ‘डीआरएस’चा वापर करताना ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांचे मत घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघावर किंवा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय आयसीसीने  जाहीर केला. यापूर्वीही अशा अनेक आक्षेपार्ह कृती करूनही श्वेतवर्णीय क्रिकेटपटू सुटले होते. भारताविरुद्ध १९९९च्या विश्वचषक सामन्यात कप्तान क्रोनिए कानामागे मायक्रोफोन लपवून त्याद्वारे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांच्या सूचना घेत होता. इंग्लंडचा माजी कप्तान मायकल ऑथर्टन याने तर चेंडू खडबडीत करण्यासाठी खिशात वाळू ठेवली होती. संधी मिळताच तो वाळू चेंडूवर रगडून चेंडूचा पृष्ठभाग खडबडीत करण्याचा प्रयत्न करीत होता. एवढेच नव्हे तर बिशनसिंग बेदी कर्णधार असताना डोक्याला ‘व्हॅसलिन’युक्त पट्टी लावून तेथील व्हॅसलिन चेंडूला लावण्याचा प्रमाद वेगवान गोलंदाज जॉन लिव्हर याने केला होता. श्वेतवर्णीय क्रिकेटपटू  त्या वेळी सहीसलामत सुटले होते. त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या भारतीयांचीच थट्टा करण्यात आली. प्रत्येक वेळी भारतीय कर्णधाराने पंचांना व संबंधितांना सावध केले होते. 
 
काेटीचा करार पाण्यात
कोहली आणि भारतीय संघाच्या तक्रारीवर आयसीसीनेकृती केली नाही. बेदीच्या तक्रारीनंतरही ‘लिव्हर’ला सोडून देण्यात आले. त्या तक्रारीचा एकच परिणाम झाला, त्यानंतर बेदीला कोटीच्या करारावर पाणी सोडावे लागले.
बातम्या आणखी आहेत...