आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी रँकिंग: क्रमवारीत भारत-पाकमध्ये अवघ्या एका गुणाचे अंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आयसीसी कसोटी संघ आणि खेळाडूंची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया ११२ गुणांसह दुसऱ्या, तर पाकिस्तान १११ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने जर इंग्लंडला २-१ ने किंवा ३-१ ने हरवले, तर त्यांची दुसऱ्या स्थानी प्रगती होईल. दुसरीकडे भारताने वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिले तरीही भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल.

खेळाडूंच्या क्रमवारीत आर.अश्विन गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या, तर अष्टपैलूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे. भारत, पाकिस्तान आणि चौथ्या स्थानावरील इंग्लंड यांच्यात गुणांचे अंतर खूप कमी आहे. यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने २-१ किंवा ३-१ ने मालिका जिंकली, तर त्यांची दुसऱ्या स्थानी प्रगती होईल. २००३ पासून अधिकृत क्रमवारी सुरू झाली तेव्हापासून पाकिस्तानने फक्त एकदा दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. पाकिस्तानकडे अव्वल स्थानावरून ऑस्ट्रेलियाला दूर करण्याचीही संधी आहे. यासाठी पाकला ३-० ने किंवा यापेक्षा चांगल्या अंतराने मालिका जिंकावी लागेल. इंग्लंड सध्या पाकिस्तानहून ३ गुणांनी मागे आहे. इंग्लंडने २-१ किंवा १-० ने मालिका विजय मिळवला, तर इंग्लिश टीम तिसऱ्या स्थानावर पाेहोचेल. आयसीसी फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलिया स्टीव्हन स्मिथ पहिल्या, न्यूझीलंडचा विल्यम्सन दुसऱ्या, द. आफ्रिकेचा हाशिम आमला तिसऱ्या स्थानी आहे. फलंदाजांत टाॅप-१० मध्ये एकही भारतीय नाही. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन ८७७ गुणांसह पहिल्या, तर भारताचा आर. अश्विन ८७१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अश्विन आणि अँडरसन यांच्यात ६ गुणांचे अंतर आहे. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या, पाकचा यासिर शाह चौथ्या, आफ्रिकेचा डेल स्टेन पाचव्या तर भारताचा रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट सातव्या, ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड आठव्या, आफ्रिकेचा मोर्कल नवव्या, फिलेंडर दहाव्या स्थानी आहे.
जेरोम टेलरची कसोटीतून निवृत्ती
किंगस्टन । वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने आंतरराष्ट्रीय कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्याने मंगळवारी ही घोषणा केली. तो वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळ कायम ठेवणार आहे. ३२ वर्षीय टेलरने विंडीजकडून ४६ कसोटी सामने खेळताना १३० बळी घेतले. भारताविरुद्ध या महिन्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत निवडीसाठी त्याच्या नावावर चर्चा झाली नाही. यानंतर त्याने औपचारिक सूचना देऊन निवृत्तीची घोषणा केली. टेलरने २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने अखेरची कसोटी खेळली. याची कारकीर्द कामगिरीपेक्षा दुखापतीमुळेच अधिक चर्चेत राहिली.
अष्टपैलूंत नंबर वन : भारताचा आर. अश्विन अष्टपैलूंच्या यादीत ४०६ गुणांसह अव्वलस्थानी आहे. बांगलादेशचा सकिब-अल-हसन दुसऱ्या, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या, द. आफ्रिकेचा फिलेंडर चौथ्या, तर इंग्लंडचा बेन स्टोक्स पाचव्या क्रमांकावर आहे.
पुढे वाचा, क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी .., आयसीसी गोलंदाजांची यादी ..
बातम्या आणखी आहेत...