आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युकी, रामकुमारच्या विजयाने भारतीय संघ दुसऱ्या फेरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यजमान भारतीय संघाने डेव्हिस चषकाच्या अाशिया/अाेशियानाच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. भारताने ग्रुप-१ मधील सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा रविवारी पराभव केला. भारताने घरच्या मैदानावर ४-१ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. रामकुमार रामनाथ अाणि युकी भांबरी यांंच्या उल्लेखनीय खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला. या दाेघांनीही सामन्यात प्रत्येकी दाेन विजय मिळवले.  भारतीय संघातील खेळाडूंनी प्रशिक्षक झीशान अली, पेस, रामकुमार अाणि युकीला उचलून विजयाचा जल्लाेष केला. युकी भांबरीने न्यूझीलंडच्या जाेसचा पराभव केला. त्याने ७-५, ३-६, ६-४ ने विजय संपादन केला. अाता भारताचा दुसऱ्या फेरीतील सामना उझबेकिस्तानविरुद्ध एप्रिलमध्ये हाेणार अाहे.
दरम्यान, भारताचा टेनिसस्टार लिएंडर पेसला दुहेरीच्या लढतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय त्याची सर्वाधिक ४३ विजयांच्या विश्वविक्रमाची संधी हुकली.   
 
रामने केला विजय निश्चित 
चाैथ्या सामन्यात बाजी मारून भारताने २ तासांमध्ये न्यूझीलंडवर विजयी अाघाडी घेतली. रामकुमारने रविवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फिन टिर्नेचा पराभव केला. त्याने ७-५, ६-१, ६-० ने सामना जिंकला. त्यामुळे भारताला ३-१ ने विजयी अाघाडी मिळाली हाेती. त्याचा स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला. यापूर्वी त्याने एकेरीत जाेसचा पराभव केला हाेता.  
बातम्या आणखी आहेत...