नवी दिल्ली - सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० ने मागे पडलेल्या
टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३९९ सामने गमावले आहेत. २३ जानेवारी रोजी सिडनीत होणाऱ्या सामन्यातही भारताचा पराभव झाला तर हा टीम इंडियाचा ४०० वा पराभव ठरेल.
टीम इंडियाने आपर्यंत ८९५ वनडे सामने खेळले आहेत. यात ४५० मध्ये भारताने विजय मिळवला. यापैकी ७ सामने टाय झाले, तर ३९ सामन्यांचा निकाल लागला नाही. दुसरीकडे विश्व चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने ८६६ सामने खेळले असून ५३७ मध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने केवळ २८९ सामने गमावले आहेत. टीम इंडिया वनडे क्रमवारीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने पाचवा वनडे जिंकला तर आपल्या क्रमवारीत फरक पडणार नाही. मात्र, आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव झाला तर टीम इंडिया द. आफ्रिकेच्याही मागे ११ गुणांसह चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या बरोबरीने पोहोचेल. मात्र, सरासरी विजयाच्या बळावर भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल.
कसोटी क्रमवारीत भारत सध्या दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेचा पराभव झाला तर भारत कसोटीत नंबर वनची टीम होईल. मात्र, वनडेत ऑस्ट्रेलियाकडून पाचवा वनडे हरलो तर भारत तिसऱ्या क्रमांकावर घसरेल. मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे १२७, भारताचे ११४ तर द. आफ्रिकेचे ११२ गुण होते.
पुढे वाचा, तीन वर्षांत १५ वेळा भारताचा पराभव....