आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आयसीसीतून 2023 पर्यंत बाहेर होऊ शकतो भारत !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागाबाबत प्रशासक समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी जे विधान केले आहे ते बीसीसीआय अधिकाऱ्यांसाठी मधुर संगीत, तर आयसीसीसाठी भयावह गाणे आहे. आयसीसीच्या प्रकरणात आम्ही (बीसीसीआय आणि सीओए) एकाच बाजूने आहोत, असे  मुंबईत शुक्रवारी ‘सचिन तेंडुलकरची बायोग्राफी’च्या उद््घाटनाच्या वेळी राय यांनी म्हटले. मागच्या आठवड्यात दुबईत आयसीसीच्या बैठकीत झालेल्या पराभवावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने ७ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली  आहे. तेव्हापासून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली पाहिजे काय? यावर चर्चा रंगली आहे.   
 
बीसीसीआय आणि सीओए यांच्यात घनिष्ठ संबंध नाहीत. लोढा समितीच्या शिफारशी वेगाने लागू करण्यास भारतीय मंडळाच्या जुन्या सदस्यांकडून विरोध झाल्यानंतर राय अँडी कंपनीसोबत संबंध अधिक बिघडले. यामुळे शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील आयसीसीचे इतके धाडस वाढले की त्यांनी बीसीसीआयला मिळवणारा महसूल निम्माच केला. आता आयसीसीप्रकरणी राय यांनी बीसीसीअायला समर्थन दिल्याने दोघांतील बिघडलेले संबंध चांगले होण्यास संधी आहे. बीसीसीआय आणि आयसीसी प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे अधिकार सीओएकडे आहेत की नाही हे अजून स्पष्ट नाही. बीसीसीआयचा महसूल कमी करण्याचा आयसीसीचा निर्णय म्हणजे क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा कमी करण्याचे प्रयत्न आहेत, असे बहुतेक क्रिकेट चाहत्यांना वाटत आहे. अति राष्ट्रवादच्या या काळात बीसीसीआयच्या हाती एक चांगली संधी आली आहे.
   
या प्रकरणात बहुतेक खेळाडू बीसीसीआयच्या बाजूने दिसत आहेत. बीसीसीआयच्या बाजूने चॅम्पियन्स ट्रॉफीचा बहिष्कार करणे हा मुद्दासुद्धा आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारताला २०२३ पर्यंत आयसीसीतून बाहेर केले जाऊ शकते. शिवाय विदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मिळणाऱ्या एनओसीवर रोख येऊ शकतो. बीसीसीअायसारख्या श्रीमंत मंडळाला रोखण्यासाठी इतके पुरेसे नाही. वर्षात दोन आयपीएलचा विचार प्रदीर्घ काळापासून चर्चेत आहे. याची अंमलबजावणी होऊ शकते. वर्षात दोन आयपीएलमुळे देशी-विदेशी खेळाडूंची कमाई दुपटीने वाढेल.  

जगभरात क्रिकेटला जितकी व्ह्यूअरशिप आणि महसूल मिळतो त्यातील ७५ टक्के भारतातून येते. अशात भारताने जर आपल्याच देशात क्रिकेटचे पूर्ण इकोसिस्टिम उभे केले तर ते अव्यावहारिक नसेल. अमेरिकेत बेसबॉल, बास्केटबॉल आणि एनएफएलचे असेच सेल्फ स्टँड इकोसिस्टिम काम करत आहे.  

या प्रकरणात बीसीसीआयसाठी मोठा धडा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक मित्रांनी त्यांची साथ साेडली आहे. याचे प्रमुख कारण पैसे आहे. पैशासाठी हे मित्र पुन्हा बीसीसीआयसोबत येऊ शकतात हेसुद्धा शक्य आहे. आता ७ मेपर्यंतचा वेळ आहे. दोन्ही पक्षांच्या लोकांनी भविष्याचा विचार करून याप्रकरणी थंड डोक्याने विचार करावा.
 
बातम्या आणखी आहेत...