आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षरला संधी; 50 वर्षांनंतर टीम इंडिया विक्रमाच्या उंबरठ्यावर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- येत्या शनिवारपासून भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेणार अाहे. भारताच्या मालिका विजयाचा हीरो ठरलेला नंबर वन अाॅलराउंडर रवींद्र जडेजा या कसाेटीला मुकणार अाहे. निलंबनाच्या कारवाईमुळे ताे या कसाेटीत खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघात युवा फलंदाज अक्षर पटेलचा समावेश करण्यात अाला. दुसरीकडे सलगच्या विजयाने टीम इंडिया अाता विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे. तिसऱ्या कसाेटीतील विजयाने भारताच्या नावे नव्या विक्रमाची नाेंद हाेणार अाहे. 
   
तिसऱ्या कसाेटीसाठी निवड झाल्याने युवा खेळाडू अक्षरला अाता अांतरराष्ट्रीय कसाेटी करिअरमध्ये शानदार पदार्पण करण्याची संधी अाहे. त्याने भारत अ संघाच्या तिरंगी मालिका विजयामध्ये माेलाचे याेगदान दिले.   

अाॅल इंडिया सीनियर निवड समितीने अागामी कसाेटीसाठी अक्षर पटेलच्या नावाला पसंती दर्शवली. त्याचा जडेजाच्या जागी संघात समावेश करण्यात अाला. येत्या शनिवारपासून तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेईल, अशी माहिती बीसीसीअायचे सचिव अमिताभ चाैधरी यांनी दिली.   

डीमेरिट गुणांमुळे दुसऱ्या कसाेटीनंतर रवींद्र जडेजावर सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात अाली. याशिवाय सामनानिधीच्या ५० टक्के रकमेची दंडात्मक कारवाई झाली.   

१९६८ नंतर विक्रमाची संधी
सलगच्या दाेन विजयांसह भारताने यजमान श्रीलंकेविरुद्धची कसाेटी मालिका अापल्या नावे केली. अाता तिसऱ्या कसाेटीतही बाजी मारून भारतीय संघाची विजयाची हॅट््ट्रिक हाेईल. याशिवाय तब्बल ५० वर्षांनंतर भारताच्या नावे एका नव्या विक्रमाची नाेंद हाेईल. विदेशी खेळपट्टीवर यजमानांविरुद्ध तीन कसाेटी जिंकण्याचा पराक्रम भारताला अापल्या नावे करता येईल. कसाेटी क्रिकेटच्या ८५ वर्षांच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा भारतीय संघ हा जगातील एकमेव अाहे. मन्सूर पतौडीच्या नेतृत्वाखाली भारताने हे यश संपादन केले हाेते. भारताने  मार्च १९६८ मध्ये न्यूझीलंड दाैऱ्यात यजमानांविरुद्धची चार कसाेटी सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली हाेती. यादरम्यान भारताने ड्युनेडिन (पहिली कसाेटी), वेलिंग्टन (तिसरी) व अाॅकलंड (चाैथी ) येथील मैदानावर विजयश्री खेचून अाणली हाेती.

तिरंगी मालिकेतील बक्षीस
दक्षिण अाफ्रिकेत झालेली तिरंगी मालिका भारताच्या अ संघाने जिंकली. यामध्ये अक्षर पटेलने माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे भारताला मालिका विजय संपादन करता अाला. त्यामुळे तिसऱ्या कसाेटीसाठी जडेजाच्या जागी संघात अक्षर पटेलची निवड करण्यात अाली. यातून त्याला मालिका विजयातील याेगदानाचे बक्षीस मिळाले अाहे. 

टी-२०: राेहितकडे नेतृत्वाची धुरा ?
तीन कसाेटी अाणि पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील सातत्यपूर्ण खेळीमुळे काेहली सप्टेंबरमध्ये विश्रांती घेण्याच्या तयारीत अाहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा राेहित शर्माकडे साेपवण्याची शक्यता अाहे. येत्या ६ सप्टेंबर राेजी भारत व श्रीलंका यांच्यात टी-२० सामना हाेणार अाहे. यातून काेहलीला ही विश्रांतीची संधी अाहे. कारण त्यानंतर काेहली हा अाॅक्टाेबरपासून जानेवारीपर्यंत हाेणाऱ्या वनडे, कसाेटी अाणि टी-२० मालिकांमध्ये सातत्याने नेतृत्व करेल.

१९८६ मध्ये संधी हुकली 
भारतीय संघाला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विक्रमाला उजाळा देण्याची संधी मिळाली आहे. १९८६ मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान इंग्लंडविरुद्ध दाेन कसाेटी सामने जिंकले. त्यानंतरची तिसरी कसाेटी ड्रॉ झाली हाेती.

३१ वर्षांनंतर अाता दुसरा गाेल्डन चाॅन्स 
काेहलीने अापल्या सक्षम नेतृत्वाच्या बळावर भारताला पुन्हा एकदा यजमानांविरुद्ध तीन कसाेटी विजयाच्या विक्रमाला उजाळा देण्याची संधी मिळवून दिली. अाता २०१७ मध्ये भारतीय संघ या विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग दाेन कसाेटी सामने जिंकले. अाता तिसऱ्या कसाेटीतील विजयावर भारताची नजर अाहे.

भारतीय संघ 
विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, राेहित शर्मा, अार. अश्विन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, हार्दिक, भुवनेश्वर कुमार, माे. शमी, कुलदीप यादव, मुकुंद.
बातम्या आणखी आहेत...