आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेविरुद्ध आक्रमक भूमिका, रवी शास्त्री यांचे नवे डावपेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी क्रिकेट क्रमवारीत जगात अव्वल (पहिल्या क्रमांकावर) आहे. परदेश दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अन्य देशांच्या संघांपेक्षा उत्तम, परिस्थिती, हवामान, खेळपट्ट्या यांच्याशी जुळवून घेऊन खेळतो. त्यांची कामगिरीही हेच दर्शवते. तरीही आक्रमक क्रिकेट खेळण्याची भूमिका आम्ही बदलणार नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचे डायरेक्टर रवी शास्त्री यांनी शुक्रवारी प्रसिद्धिमाध्यमांपुढे बोलताना स्पष्ट केले.

येत्या २ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका संघाच्या दोन महिन्यांच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे. त्यासाठी भारतीय संघाचा सराव बंगळुरू येथे सुरू आहे. त्या वेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचे आपले डावपेच स्पष्ट केले.

भारतीय संघातील फलंदाजांचे क्रमांकही कायम नाहीत. कुणीही कोणत्याही क्रमांकावर शाश्वत नाही. आघाडीच्या फळीतील फलंदाजाला संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर खेळता आले पाहिजे. श्रीलंकेत मुरली विजय व धवन हे जायबंदी झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी क्रमांक बदलावे लागले. श्रीलंकेत ५ गोलंदाज खेळवण्याची विराटने राबवलेली कल्पना कायमस्वरूपी नाही,असेही ते या वेळी म्हणाले.
आम्ही भूमिकेवर ठाम राहणार
दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी क्रिकेट क्रमवारीत जगात अव्वल आहे. परदेश दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अन्य देशांच्या संघांपेक्षा उत्तम, परिस्थिती, हवामान, खेळपट्ट्या यांच्याशी जुळवून घेऊन खेळतो. त्यांची कामगिरीही हेच दर्शवते. तरीही आक्रमक क्रिकेट खेळण्याची भूमिका आम्ही बदलणार नाही, असेही या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे डायरेक्टर रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.