आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिलांचा शेवटच्या चेंडूवर अाफ्रिकेवर विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- कर्णधार हरमनप्रीत काैरने (नाबाद ४१) शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला महिलांच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या फायनलमध्ये विजय मिळवून दिला. भारतीय महिलांनी मंगळवारी अंतिम सामन्यामध्ये दक्षिण अाफ्रिकेवर १ विकेटने राेमहर्षक विजय संपादन केला. भारताची दीप्ती शर्मा सामनावीर व अाफ्रिकेची लुस मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.  
 
अाफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने ९ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. यासाठी कर्णधार हरमनप्रीत काैरने एकाकी झंुज दिली.  दीप्ती शर्मा (७१) अाणि माेना मेश्राम (५९) यांनी विजयामध्ये अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. याशिवाय वेदा कृष्णमूर्तीने ३१ व शिखा पांडेने १० धावांची खेळी केली. भारताकडून माेना मेश्राम अाणि कामिनीने(१०) दमदार सुरुवात केली.
 
हरमनप्रीतची एकाकी झंुज :  कर्णधार हरमनप्रीत काैरने एकाकी झंुज दिली. एका टाेकाने तळातले फलंदाज झटपट बाद हाेत असताना दुसऱ्या टाेकाने तुफानी फटकेबाजी केली. तिने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा काढल्या. यात दाेन चाैकार व एका षटकाराचा समावेश अाहे. या खेळीच्या बळावर तिने भारताचा विजय निश्चित केला. 
 
राजेश्वरी, शिखाची धारदार गाेलंदाजी : युवा गाेलंदाज राजेश्वरी गायकवाड अाणि शिखा पांडेने धारदार गाेलंदाजी केली. त्यामुळे अाफ्रिकेला २४४ धावांमध्ये गाशा गुंडाळावा लागला. राजेश्वरीने ९ षटकांत ५१ धावा देताना ३ विकेट घेतल्या. शिखाने ८ षटकांत ४१ धावा देऊन २ गडी बाद केले. तसेच एकता बिस्ट, पूनम यादव अाणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ बळी घेतला. यातूनच अाफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांना समाधानकारक खेळी करता अाली नाही. अाफ्रिकेकडून प्रिझने सर्वाधिक ४० धावा काढल्या.   
संक्षिप्त धावफलक : द.अाफ्रिका :  २४४ धावा, भारत : ९ बाद २४५ धावा.
 
दीप्ती-माेना मेश्रामची शतकी भागीदारी 
सलामीवीर माेना मेश्राम व दीप्तीने तुफानी फटकेबाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर त्यांनी संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. यादरम्यान दीप्तीने शानदार अर्धशतक ठाेकले. तिने ८९ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकारांसह सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. माेनाने ८२ चेंडूंमध्ये ५९ धावा काढल्या. यात ७ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...