आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड सामन्याने महिला विश्वचषकाची होणार सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
 लंडन  - भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषकात यजमान इंग्लंडविरुद्ध सामन्याने आपल्या अभियानाला सुरुवात करेल. स्पर्धेचा उद््घाटनाचा सामना डर्बीच्या मैदानावर खेळवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी महिला विश्वचषकाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. स्पर्धेत ८ संघ सहभागी होतील.  
 
आतापर्यंत या स्पर्धेचे ९००० तिकिटांची विक्री झाली आहे, असे आयसीसीने सांगितले. भारत डर्बीत आपले चार सामने खेळेल. यात २ जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध हायहोल्टेज सामना रंगेल. भारतीय महिला संघ टाँटेनमध्ये वेस्ट इंडीजशी, ब्रिस्टलमध्ये ऑस्ट्रेलियाशी, लिस्टर येथे द. आफ्रिकेविरुद्ध लढेल. भारताने श्रीलंकेत क्वालिफायर स्पर्धा जिंकून विश्वचषकात प्रवेश केला. गतचॅम्पियन ऑस्ट्रेलिया २६ जून रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध लढतीने अभियानाला सुरुवात करेल. 
बातम्या आणखी आहेत...