आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकच्या क्रिकेट, हाॅकी टीम भिडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
बंगळुरू- कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट अाणि हाॅकी टीम अाता जूनमध्ये इंग्लंडमधील स्पर्धांमध्ये झुंजणार अाहेत. यामध्ये चॅम्पियन्स ट्राॅफी क्रिकेट अाणि वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलचा समावेश अाहे. येत्या १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीला सुुरुवात हाेत अाहे. यामध्ये ४ जून राेजी भारत अाणि पाकिस्तान टीम क्रिकेटच्या सामन्यासाठी समाेरासमाेर असतील. दुसरीकडे १८ जून राेजी वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये भारत अाणि पाकमधील झंुज रंगणार अाहे. येत्या १ जूनपासून भारतीय हाॅकी टीम जर्मनीतील डुसेलडाेर्फ येथील हाॅकी मालिकेमध्ये खेळणार अाहे. युवा कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हाॅकी संघ साेमवारी जर्मनीला रवाना झाला. या ठिकाणी तीन देशांच्या निमंत्रित हाॅकी मालिकेचे अायाेजन करण्यात अाले. येत्या १ जूनपासून या हाॅकी मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. या मालिकेमध्ये यजमान जर्मनीसह भारत अाणि बलाढ्य बेल्जियम टीमचा समावेश अाहे.    
या स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ रवाना झाला. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाचे बंगळुरू येथील साईमध्ये खास प्रशिक्षण शिबिर अायाेजित करण्यात अाले हाेते. भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचा युवा गाेलरक्षक अाकाश चिकटेचा समावेश अाहे. त्याचा हा करिअरमधील तिसरा अांतरराष्ट्रीय दाैरा अाहे.      

‘या मालिकेमध्ये अाम्हाला अाॅलिम्पिक पदक विजेत्या जर्मनी अाणि बेल्जियमच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे. मात्र, या स्पर्धेच्या माध्यमातून अाम्हाला अागामी वर्ल्ड हाॅकी लीगची तयारी करण्याची संधी मिळणार अाहे. त्यामुळे या लीगमध्ये सरस खेळी करण्याचा प्रयत्न असेल. या दाेन्ही बलाढ्य संघांविरुद्ध अव्वल कामगिरी करण्यावर अधिक भर असेल,’ असे मनप्रीत म्हणाला. 
 
भारत-पाक हाॅकी सामना रंगणार 
भारतीय संघ अापल्या वर्ल्ड हाॅकी लीगमधील माेहिमेला १५ जून राेजी सुरुवात करणार अाहे. या वेळी  भारत अाणि स्काॅटलंड टीम समाेरासमाेर असतील. त्यानंतर भारताचा दुसरा सामना १७ जून राेजी कॅनडाशी हाेईल. १८ जून राेजी भारत अाणि पाकिस्तान हे दाेन कट्टर प्रतिस्पर्धी झुंजणार अाहेत. त्यानंतर २० जून राेजी भारताचा गटातील शेवटचा सामना हाॅलंडशी हाेणार अाहे.
 
९ जून राेजी भारतीय संघ लंडनमध्ये हाेणार दाखल 
भारतीय संघ अाता अागामी वर्ल्ड लीगमध्येही अापले नशीब अाजमावणार अाहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारताचा संघ ९ जून राेजी लंडन येथे दाखल हाेणार अाहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये भारताचा संघ सराव सामनेही खेळणार असल्याची माहिती हाॅकी इंडियाच्या वतीने देण्यात अाली. यामध्ये अाॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना अाणि इंग्लंड टीमचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...