आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल लिलाव २१ फेब्रुवारीला! यंदा आयपीएल ५ एप्रिल-२१ मेदरम्यान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कार्यकारिणीवर अंकुश आणल्यानंतर आयपीएलच्या यंदाच्या आयोजन व्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणारी यंदाचा आयपीएलचा खेळाडूंचा ‘लिलाव’ पुढे ढकलण्यात आल्याने अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र प्रशासकीय मंडळाने हाच लिलाव आता २१ फेब्रुवारी रोजी ठेवल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. त्यामुळे आयपीएलबाबतची संभ्रमावस्था लवकरच संपुष्टात येईल, अशी आशा आहे. 

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने यंदाची आयपीएल स्पर्धा ५ एप्रिल ते २१ मे या कालावधीत आयोजित करण्याचे ठरविले होते. त्या दृष्टीने त्यांनी खेळाडूंचा लिलाव ४ फेब्रुवारी रोजी ठेवला होता.
 
मात्र २ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना पदच्युत करून उर्वरित पदाधिकाऱ्यांवरही अनेक निर्बंध आणल्यामुळे बीसीसीआयच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेचा गोंधळ उडाला आहे. ही घडी बसविण्यासाठी न्यायालयाने प्रशासक मंडळ नेमले असून, त्यांच्यामार्फत व सीईओच्या माध्यमातून कामकाज सुरू झाले आहे. 
या मंडळाने समोवारी कामकाजाला सुरुवात केली असून, आयपीएलच्या आयोजनाचा प्रश्न सर्वप्रथम हातात घेतला आहे. बीसीसीआय व्यवस्थापनाशीही त्यांनी चर्चा केली आहे. 

प्रशासन मंडळाने सोमवारी सर्व संबधितांशी चर्चा करून आयपीएल २०१७ च्या आयोजनासंबधी सूचना दिल्या आहेत. आयपीएल आयोजनाकरिता लागणाऱ्या सर्व सेवा पुरविणाऱ्यांना, यंदाच्या हंगामासाठी कायम ठेवावे असेही मंडळाने आदेश दिले आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...