आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल अभ्यास गटाच्या भेटीगाठी सुरू; "त्या' टीमवर अभ्यास गटाचाही बहिष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयपीएल कौन्सिलने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी आणि आयपीएल ९ बाबत निर्णय घेण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझींना वगळून चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी व सौरव गांगुली या चौघांचा अभ्यास गट स्थापण्यात आला आहे. लोढा समितीने बंदी घातलेल्या दोन फ्रँचायझींच्या जागी कुणाला घ्यायचे आणि नियमांच्या चौकटीत कसे बसवायचे
हा गहन प्रश्न या अभ्यास गटाला पडला आहे. आयपीएल अभ्यास गटाला आपला अहवाल सहा आठवड्यांच्या आत बोर्डाला सादर करायचा आहे. ८ आयपीएल संघांपैकी उर्वरित ६ संघांना अभ्यास गट भेटणार आहे. त्यांच्या पुरस्कर्त्यांशी, जाहिरातदारांशी आणि प्रसारण
हक्कधारकांशी भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे.

ब्रँड झाले नाराज
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग व अन्य बदनामीकारक घटनांमुळे फ्रँचायझींशी संबंधित कंपन्या व ब्रँड्सनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. अभ्यास गट फ्रँचायझींच्या मुंबईतील ब्रँड्स व पुरस्कर्त्यांनाही भेटणार आहेत. कोची टस्कर्सचेही उर्वरित कालावधीसाठी स्पर्धेत खेळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.