आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत रंगला इशांतचा विवाह सोहळा, शुभेच्छा देण्यासाठी धोनी-युवराजसह पोहोचले दिग्गज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंह यांचा शुक्रवारी गुडगांवमध्ये विवाह झाला. - Divya Marathi
इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंह यांचा शुक्रवारी गुडगांवमध्ये विवाह झाला.
दिल्ली - टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माचा विवाह शुक्रवारी रात्री बास्केटबॉल प्लेयर प्रतिमा सिंह हिच्याशी झाला. गुडगांव येथील एका फार्म हाऊसवर लग्नाचे विधी झाले. यावेळी इशांतने रेड आणि गोल्डन कलरची शेरवानी परिधान केलेली होती. तर प्रतिमा पिवळ्या रंगाच्या लग्नाच्या पोषाखात खुलून दिसत होती. 

युवी-धोनीची उपस्थिती.. 
- इशांतला शुभेच्छा देण्यासाठी एमएस धोनी आणि युवराज सिंगसह अनेक दिग्गज उपस्थित होते. 
- धोनी आणि युवराज एकटेच कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर नव्हत्या. 
- दोघे क्रिकेटपटू कार्यक्रमात पोहोचतात त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी तरुणींनी गर्दी केली. 
- यावेळी पहिलवान योगेश्वर दत्तदेखिल याठिकाणी उपस्थत होता. त्यानेही नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. 

19 जूनला झाला होता साखरपुडा 
- याचवर्षी 19 जूनला इशांत आणि प्रतिमा यांचा साखरपुडा झाला होता. 
- प्रतिमा वाराणसीची राहणारी असून ती इंडियन वुमन्स नॅशनल बास्केटबॉल टीमची सदस्य आहे. 
- प्रतिमासह तिच्या घरात पाच बहिणी आहेत. त्यांना \'सिंह सिस्टर्स\' नावाने ओळखले जाते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इशांत शर्माच्या लग्नाचे PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...