आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दालमिया यांच्यावर अंत्यसंस्कार, ईडन गार्डनवर अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दालमियांचा मुलगा अभिषेकचे सांत्वन करताना अनुराग ठाकूर व राजीव शुक्ला. - Divya Marathi
दालमियांचा मुलगा अभिषेकचे सांत्वन करताना अनुराग ठाकूर व राजीव शुक्ला.
कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात कियोरातला क्रिमेटोरियम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. या वेळी दर्शनासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली. त्यानंतर मुलगा अभिषेकने दालमिया यांना भडाग्नी दिला. या वेळी त्यांची मुलगी वैशालीही उपस्थित होती. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह राज्याचे शहर विकासमंत्री फरहद हकीम, कोलकाता महापालिकेचे महापौर शोवन चटर्जी उपस्थित होते.
या वेळी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, माजी अध्यक्ष शशांक मनोहर, शरद पवार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के, झारखंड क्रिकेटचे अध्यक्ष अमिताभ चौधरी, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दालमिया यांच्या पार्थिवावर पुष्प वाहिले.
ममता बनर्जींनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रद्धाजंली वाहिली. याप्रसंगी रवी शास्त्री, अनुराग ठाकूर उपस्थित होते. ‘दालमिया यांचे क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे राज्यात क्रिकेटला चालना मिळाली. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे,’ अशा शब्दांत बॅनर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली.