आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता राज्य संघटना चाचपडताहेत! निवडणुका १५ नाेव्हेंबरपर्यंतची सक्ती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोढासमितीच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही बीसीसीआयच्या सर्व राज्य संघटनांना त्या आदेशाची कशी अंमलबजावणी करायची, ते कळेना. मुंबई क्रिकेट असोसिएशनसारख्या प्रगत संघटनेकडे तज्ज्ञांची फौज असूनही नेमके काय करायचे, ते कळेनासे झाले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने लोढा समितीच्या शिफारशींनुसार आपली घटना बदल करून घेण्यासाठी सर्वश्री रवी सावंत (विशेष निमंत्रक), जितेंद्र आव्हाड, राजीव पत्की, जोशी, श्रीपाद हळबे यांची समिती स्थापन केली. या समितीच्या बैठकाही झाल्या आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीने लोढा समितीच्या शिफारशींनुसार आपल्या घटनेत बदल करण्यासाठी तत्काळ पावले उचलली. त्यासाठी समिती नेमून बैठकाही सुरू झाल्या. मात्र अलीकडेच लोढा समितीने बीसीसीआयला १५ नोव्हेंबरच्या आत सर्व राज्य संघटनांच्या निवडणुका झाल्या पाहिजे, अशी तंबी दिल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले आहे. एवढ्या अल्प अवधीत नव्या शिफारशींनुसार घटनेत बदल कसा करणार, एमओयू कधी तयार होणार. घटनेनुसार तो वार्षिक सभेपुढे कधी मंजुरीसाठी ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतरच निवडणुका घेता येतील. दरम्यान भारतात न्यूझीलंड संघाची मालिका होणार आहे. पाठोपाठ इंग्लंड संघही येणार आहे. या सर्व सामन्यांच्या आयोजन व्यवस्थेत सर्व असोसिएशन व्यग्र असतील.

रात्र थाेडी, साेंगे फार
त्यामुळेलोढा समितीच्या इच्छेनुसार कसे, कधी आणि कितपत काम करायचे, हे कळण्याइतपत अवधीही राज्य संघटनांकडे नाही. त्यामुळे ‘रात्र थाेडी, साेंगे फार’ म्हणण्याची वेळ संघटनेवर अाली अाहे. सर्व राज्य संघटनांवरचे पदाधिकारी, समिती सदस्य कार्यकर्ते हे आपापली कामे सांभाळून विनामूल्य सेवा देत असतात. त्यामुळे फावल्या वेळात त्यांना लोढा समितीने अपेक्षा केलेला कामाचा वेग राखता येणार आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...