आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप दहाड देणार लाराच्या टीमला प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- अाैरंगाबादचा संदीप दहाडच्या मार्गदर्शनाखाली अाता जगातील सर्वात सर्वाेत्कृष्ट माजी कसाेटीपटू ब्रायन लारा अाणि टीम गाेलंदाजीचे धडे गिरवणार अाहे. येत्या २८ जानेवारीपासून मास्टर्स चॅम्पियन्स लीगचे अायाेजन करण्यात अाले. या लीगमध्ये वेस्ट इंडीजच्या नेतृत्वाखाली लियाे लाॅयन टीम नशीब अाजमावणार अाहे. ही लीग २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान दुबईत रंगणार अाहे. संदीप दहाडची लियाे टीमच्या गाेलंदाजीसाठी सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात अाली. प्रशिक्षक हुपरसाेबत दहाड टीमला गाेलंदाजीचे प्रशिक्षण देणार अाहे. या टीममध्ये रमेश पाेवारचा समावेश अाहे.

अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्त दिग्गज खेळाडूंच्या सहभागातून ही लीग रंगणार अाहे. या लीगमध्ये सहा टीम सहभागी झाल्या अाहेत.

दुबईत सरावाला सुरुवात : मास्टर्स चॅम्पियन्स लीगच्या तयारीसाठी लियाे लाॅयन्स टीमने दुबईत सराव सुरु केला. यासाठी चार दिवसीय शिबिराचे अायाेजन करण्यात अाले. यामध्ये खेळाडू सरावावर भर देणार अाहेत.

दहाडला पहिली संधी :
अांतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देण्याची पहिलीच संधी संदीप दहाडला मिळाली अाहे. अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अापल्या अव्वल कामगिरीने कारकीर्द उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका मुंबईचा माजी रणजीपटू दहाड बजावणार अाहेत.

संजय दत्तची टीम
मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी झालेला लियाे लाॅयन्स संघ हा सिनेभिनेता संजय दत्तचा अाहे.त्याची पत्नी मान्यता दत्त ही या टीमची मालक अाहे. गत वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांनी या टीमची खरेदी केली. या टीममध्ये रमेश पाेवार अापले नशीब अाजमावणार अाहे.

सर्वाेत्कृष्ट प्रशिक्षणावर भर
अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या टीमला सर्वाेत्कृष्ट प्रशिक्षण देण्यावर मी भर देणार अाहे. टीममधील सर्वांनीच अापला काळ गाजवलेला अाहे. मात्र, या लीगच्या निमित्ताने ते पुन्हा मैदानावर परतले. त्यांना याेग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असेल.
संदीप दहाड, सहायक प्रशिक्षक, लियाे लाॅयन्स.
-२९ जानेवारीपासून लियाे टीम अापल्या माेहिमेला सुरुवात करणार अाहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असे असतील सघ...