आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग लीजेंड मोहम्मद अली यांनी 10 वर्षांपूर्वी केले होते स्वतःच्या अंत्यविधीचे नियोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंटुकी (यूएस) - शुक्रवारी बॉक्सिंग लीजेंड मुहम्मद अली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी 10 वर्षांपूर्वीच स्‍वत:च्‍या अंत्यविधीचे नियोजन केले होते. एवढेच नाही तर या बाबत त्‍यांनी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवली होती, अशी माहिती त्‍यांच्‍या एका निकटवर्तीयाने दिली. त्‍यांच्‍या या डायरीला 'द बुक'चे नाव दिले गेले. यात त्यांनी काय लिहिले आहे याचा लवकरच खुलासा होईल. यावरून हेही कळेल की, त्यांची कशा पद्धतीने जगाचा निरोप घ्याण्याची इच्छा होती. येत्‍या शुक्रवारी त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार होणार आहेत.
जगभरातील दिग्गज होणार अंत्ययात्रेत सहभागी...
> मोहम्मद अली यांच्यावर त्यांच्या मुळ गावी लुईसविले येथे सकाळी नऊ वाजून 55 मिनिटांनी अंतीम संस्कार होतील.
> या विधीसाठी जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहतील.
> कॅलिफोर्नियाचे इमाम जैद शाकिर लुईसविले येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार करतील. यावेळी
> यूएसचे माजी प्रेसिडेंट बिल क्लिंटनही उपस्थित राहतील.
सामान्य मानसांनीही व्हावे अंत्ययात्रेत सामील अशी होती इच्छा...
- अली यांच्या अंतिम संस्काराच्या एकदिवस आधी त्यांच्या धर्माच्या लोकांना परंपरागत पद्धतीने त्यांना निरोप देण्याची संधी मिळेल.
- त्यांचे पार्थीव गुरुवारी लुइसविलेच्या फ्रीडम हाॅलमध्ये ठेवले जाणा आहे. अंदाजे येथे 18,000 लोक येण्याची शक्यता आहे.
- अली यांनी येथेच 1960 मध्ये कारकिर्दितील पहिली फाइट खेळली होती .
- त्यांच्याच परिवारातील एका सदस्य बॉब गुननेल यांनी सांगितल्यानुसार, "अलली मृत्यूवर बोलतांना कधीच नाराज होत नसत."
- " त्यांची इच्छा होती की, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हिआयपींपासून ते सामान्य नागरिकांनीही यावे."
पुढील स्लआइड्सवर जाणून घ्या, कोठे होणार अली यांच्यावर अंत्यसंकार...
बातम्या आणखी आहेत...