आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात फ्रॅक्चर असताना शतक ठोकले : शिखर धवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्ध गाले कसोटीत क्षेत्ररक्षण करताना भारताचा सलामीवीर शिखर धवनचे हात फ्रॅक्चर झाले होते. यानंतरही त्याने पुढच्या दिवशी संघाची गरज पाहताना फलंदाजी केली. त्या सामन्यात धवनने १३४ धावा आणि दुसऱ्या डावात २८ धावा काढल्या होत्या. याबाबत धवन म्हणाला, "फ्रॅक्चर झाल्यानंतर मी पेनकिलर औषधे घेतली होती. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. वेदना होत असताना मी चार दिवस खेळत होतो. गाले कसोटीनंतर मी दोन सामने खेळू शकलो नाही, याचे मला दु:ख आहे. मी अजून पूर्णपणे फिट झालेलो नाही. मी वेगाने दुरुस्त होत आहे. २७ सप्टेंबरपर्यंत मी पूर्णपणे फिट होईन, अशी आशा आहे. यानंतरच मी सरावाला सुरुवात करेन,' असे भारताच्या या सलामीवीराने नमूद केले. यशापेक्षा अपयशातून माणसाला अधिक शिकायला मिळते, असे माझे मत आहे.
पुढच्या मालिकेबाबत
शिखर धवनला बांगलादेश अ संघाविरुद्ध भारत अ संघाचे नेतृत्व करायचे आहे. यानंतर तो द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी व वनडे मालिकेत खेळेल. आम्हाला दक्षिण आफ्रिकेला हरवायचे आहे. आम्ही प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले तर निकाल बरोबर मिळतील, असे तो म्हणाला.
फिरकीला खेळण्यात तरबेज
भारतीय फलंदाज फिरकीला योग्यपणे खेळू शकत नाही, हा आरोप त्याने फेटाळलेे. द. आफ्रिकेचे फिरकीपटू इम्रान ताहिर आणि डेन पीएट यांना खेळण्यासाठी काय होमवर्क केले, असे विचारले असता धवन म्हणाला, "भारतीय फलंदाज विदेशातील फिरकीपटूंना खेळत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मी स्वीप शॉटचा सराव करीत आहे. हा माझा फेव्हरेट फटका आहे. मुरली विजय आणि लोकेश राहुलही कसोटीत सलामीवीर आहेत. माझे दोघांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमच्यात सकारात्मक स्पर्धा आहे,' असे या वेळी शिखर धवनने नमूद केले.
- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माझ्यासोबत हेच घडले. विश्वचषकापूर्वी मी खूप मेहनत घेतली. सर्वजण माझ्यावर टीका करीत होते.

- मी फॉर्मशी संघर्ष करीत होतो. या स्थितीला एक खेळाडूच अधिक योग्यपणे समजू शकतो. काय करायचे आहे, हे खेळाडूच कळते.