काेलंबाे- भारत अाणि दक्षिण अाफ्रिका महिला संघांमध्ये मंगळवारी विश्वचषकाच्या पात्रता फेरीची फायनल हाेणार अाहे. काेलंबाेच्या मैदानावर हा अंतिम सामना अायाेजित करण्यात अाला. भारताने सलग विजय संपादन करून अंतिम फेरी गाठली. भारताने गत सामन्यामध्ये कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने ७ गड्यांनी हा सामना जिंकला. दुसरीकडे अाफ्रिकेच्या महिला संघाने अायर्लंडचा पराभव केला.
भारतीय महिला संघाला अाता अव्वल कामगिरीची अाशा अाहे. कर्णधार मिताली राज फाॅर्मात अाहे. तिने सरस खेळी करताना स्पर्धेमध्ये एकूण २०९ धावा काढल्या अाहेत. याशिवाय पूनम यादव, कामिनी अाणि शिखा पांडे सध्या फाॅर्मात अाहेत.