आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची अाजपासून रंगीत तालीम, दाेनदिवसीय सराव सामना अाजपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेसेटेर - टीम इंडिया अाता अागामी यजमान वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसाेटी मालिकेसाठी रंगीत तालीम करणार अाहे. यासाठी सराव सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. येत्या २१ जुलैपासून भारत अाणि यजमान विंडीज यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत अाहे.
शनिवारपासून टीम इंडिया अाणि यजमानांच्या बाेर्ड अध्यक्ष एकादश यांच्यातील पहिल्या दाेनदिवसीय सराव सामन्याला सुरुवात हाेणार अाहे. भारताने यापूर्वी २०११ मध्ये विंडीजचा दाैरा केला हाेता. या दाैऱ्यात भारतीय कसाेटी टीमचा कर्णधार विराट काेहलीला अापल्या अांतरराष्ट्रीय कसाेटी करिअरमध्ये पदार्पण करता अाले हाेते. अाता त्याला याच दाैऱ्यात टीमसाठी अव्वल कामगिरी करण्याची संधी अाहे. विंडीजविरुद्धच्या कसाेटी मालिकेतील एकतर्फी विजयाने टीम इंडियाला कसाेटीच्या क्रमवारीत नंबर वन हाेण्याची संधी अाहे. भारतीय संघाची फलंदाजी मजबूत असल्याचे दिसते. संघात विराटसह अजिंक्य शिखर धवन, मुरली विजय, लाेकेश राहुल, चेतेश्वर पुजारा अाणि राेहित शर्माचा समावेश अाहे.
जखमी अश्विन बाहेर
दाैऱ्यापूर्वी अाॅफस्पिनर अार. अश्विनला गंभीर दुखापत झाली अाहे. त्यामुळे त्याला अाता पहिल्या सराव सामन्यातून डच्चू देण्यात येणार अाहे. विश्रांतीनंतर त्याला पहिल्या कसाेटीत सहभागाची संधी मिळेल.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...