आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच संघाचे कच्चे दुवे अभ्यासून तयारी : अनिल कुंबळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई  - १७ कसोटींच्या देशातील या प्रदीर्घ हंगामातील पुण्यातील १४वी कसोटी आहे. गेल्या ३ मालिकांमधील ‘की मोमेंट्स’ किंवा कलाटणीचे क्षण कोणकोणते होते, त्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. त्यापैकी कोणते क्षण भारतीय संघाने जिंकले होते तर कोणत्या क्षणी प्रतिस्पर्ध्यांनी मात केली होती, याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत आम्ही उतरलो आहोत, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पुण्यात सांगितले.    
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठीची आपली योजना, डावपेच काय असतील हे सांगण्यापेक्षा आम्ही जिंकलेल्या मालिकेतही काय गमावले होते याचा शोध घेऊन या वेळी उतरलो आहोत, असे कुंबळे म्हणाला.
 
ऑस्ट्रेलियन संघ पक्का व्यावसायिक संघ आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक सत्राचाच विचार करून, त्यानुसार डावपेच आखून उतरणार आहोत. एका वेळी एका कसोटीचाच विचार करून आम्ही उतरणार आहोत, असे त्यांनी म्हटले ३ कप्तान कोहली याने ५० कसोटींनंतरच एवढे काही कमावले आहे की त्याचे कौतुक वाटते.
 
 एवढेच नव्हे तर अश्विनसारख्या खेळाडूने २५० कसोटी बळी सर्वाधिक वेगात मिळवले याचेच कौतुक वाटते. आमच्याप्रमाणे पूर्वतयारी प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन संघानेही केली आहे.   मात्र आम्ही आमच्या शक्तिस्थानांचा आणि कच्च्या दुव्यांचा अभ्यास केला आहे, असे भारतीय प्रशिक्षक कुंबळेने नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...