आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीने दिल्या राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी कर्णधार राहुल द्रविडने बुधवारी वयाची ४४ वर्षे पूर्ण केली. सोशल मीडियामध्ये त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. भारताच्या १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाचा कोच असलेल्या द्रविडला शुभेच्छा देताना भारतीय कर्णधार कोहली म्हणाला की, ‘राहुलभाई जन्मदिनाच्या शुभेच्छा. सर्व युवा खेळाडूंचा आदर्श बनल्याबद्दल आणि सर्वांना प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद.’ आयसीसीनेदेखील त्याच्या योगदानाबद्दल कौतुक करताना म्हटले की, ‘द्रविड क्रिकेटचा महान फलंदाज आहे. ज्याने २४,२०८ आंतरराष्ट्रीय धावा केल्या. तो जगातील फलंदाजांत सहाव्या स्थानी आहे. राहुल द्रविडला ४४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल, सेहवागनेसुद्धा शुभेच्छा दिल्या.