आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी ट्रॉफी: राहुल-अंकितने डाव सावरला, राहुल त्रिपाठीचे नाबाद शतक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रणजी ट्रॉफीत राहुल त्रिपाठीचे (११६) शानदार नाबाद शतक आणि अंकित बावणेच्या (५९) नाबाद अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २९६ धावा काढत दमदार सुरुवात केली. बंगालने पहिल्या डावात ५२८ धावांचा डोंगर उभारत डाव घोषित केला.

महाराष्ट्र आणखी २३२ धावा मागे असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच बंगालने कालच्या ८ बाद ५२८ धावांवर डाव घोषित केला. महाराष्ट्राचे खेळाडू फलंदाजीस येताच संघाच्या ११ धावा असताना अशोक दिंडाने दुसरा सलामावीर हर्षद खडिवालेला ५ धावांवर बाद करत संघाला पहिला झटका दिला. सलामीवीर स्वप्निल गुगळेने ३५ धावा केल्या. संग्राम अतितकरने (६९) अर्धशतक ठाेकले. राहुल त्रिपाठीने २२७ चेंडूंत १३ चौकार व २ षटकार खेचत नाबाद ११६ धावा जोडल्या. त्याला साथ देत अंकित बावणेने (नाबाद ५९) अर्धशतकी खेळी केली.

संक्षिप्त धावफलक
बंगाल ८ बाद ५२८ धावांवर डाव घोषित. महाराष्ट्र संग्राम अतितकर ६९, राहुल त्रिपाठी नाबाद ११६, अंकित बावणे नाबाद ५९ धावा. अशोक दिंडा २/७७.