इंदूर - गुजरातला हाेळकर मैदानावर पहिल्यांदा रणजी चषक जिंकण्याची संधी अाहे. पार्थिव पटेल अापल्या कुशल नेतृत्वाखाली गुजरातला विजेतेपद मिळवून देण्यासाठी यशस्वी हाेण्याचे चित्र अाहे. त्यामुळे ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघावर संक्रांतीचे सावट निर्माण झाले अाहे. चाैथा दिवस मुंबईने गाजवला. कर्णधार अादित्य तारे (६९) अाणि अभिषेक नायरच्या (९१) झंझावाती फलंदाजीच्या बळावर मुंबईने चाैथ्या दिवशी ४११ धावांची खेळी केली. यासह मुंबईने गुजरातसमाेर ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात गुजरातने दिवसअखेर बिनबाद ४७ धावांची खेळी केली. अद्याप २६५ धावांनी पिछाडीवर असलेल्या गुजरातकडे १० विकेट शिल्लक अाहेत. अाता शेवटच्या अाणि पाचव्या दिवशी अावाक्यातले लक्ष्य गाठून किताब जिंकण्याचा गुजरातचा प्रयत्न असेल. प्रियंक पांचाळ (३४) अाणि समित गाेयल (८) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. अाता टीमला या दाेघांकडून माेठ्या खेळीची अाशा अाहे. प्रियंक हा सध्या फाॅर्मात अाहे.
चिंतन गजाचे सहा बळी : गुजरातचा युवा वेगवान गाेलंदाज चिंतन गजाने शानदार खेळी केली. त्याने १२१ धावा देताना मुंबईचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने ६ विकेट घेतल्या.
अादित्य, अभिषेक, सूर्यकुमार चमकले
मुंबईकडून अभिषेक नायर अाणि कर्णधार अादित्य चमकले. या दाेघांनी संघाचा डाव सावरत वैयक्तिक अर्धशतके ठाेकली. सूर्यकुमारने ४९, तर अभिषेकने १४६ चेंडूंचा सामना करताना प्रत्येकी पाच चाैकार अाणि षटकार ठाेकून ९१ धावांची खेळी केली. ९ धावांनी त्याचे शतक हुकले. त्याला अार. पी. सिंगने बाद केले. अादित्यने ११४ चेंडूंमध्ये ६९ धावा काढल्या. यामध्ये १२ चाैकारांचा समावेश अाहे.
मुंबईची मदार गाेलंदाजीवर
सामन्याच्या पाचव्या अाणि शेवटच्या दिवशी हाेळकर मैदानावर मुंबईची मदार गाेलंदाजांवर असेल. याशिवाय या गाेलंदाजांची खरी परीक्षा असेल. दुसरीकडे गुजरातच्या फलंदाजांनाही तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. त्यामुळे अाता शेवटच्या दिवसाचा खेळ अधिकच रंजक हाेण्याची शक्यता अाहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : पहिला डाव : २२८ धावा, दुसरा डाव : ४११ धावा, गुजरात : पहिला डाव : ३२८, दुसरा डाव : ०/४७ धावा.