आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी करंडक फायनल: गुजरातच्या गोलंदाजीपुढे मुंबई २२८ धावांत गारद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - थंडगार वाऱ्यामुंळे होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी ट्राॅफी फायनलच्या पहिल्या दिवशी गुजरातच्या गोलंदाजांना फायदा झाला. थंड वातावरण आणि रात्री पडणाऱ्या दवबिंदूंचा परिणाम होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर दिसला. गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करून मुंबईला पहिल्या डावात अवघ्या २२८ धावांत गुंडाळले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा गुजरातने पहिल्या डावात बिनबाद २ धावा काढल्या.  

नाणेफेकीचा कौल पार्थिवच्या बाजूने : गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने टॉस जिंकून हवामानाचा अंदाज घेत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. गुजरातच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. मुंबईची पहिली विकेट १३, तर दुसरी विकेट ५४ धावांवर पडली.  मुंबईच्या धावफलकावर अवघ्या १३ धावाच झाल्या होत्या, तेव्हा रुद्रप्रतापसिंगने अखिल हेरवाडकरला पायचीत (४) केले. यानंतर १८ व्या षटकात गाजाने पहिल्या चेंडूवर श्रेयस अय्यरला (१४) पार्थिवकडे झेल देण्यास भाग पाडले. गाजाने मुंबईला दुसरा धक्का दिला. 
 
दुसऱ्या सत्रात ४ विकेट   
मुंबईसाठी दुसरे सत्र अडचणीचे ठरले. दुसऱ्या सत्रात पृथ्वी शॉच्या रूपाने मुंबईने १०६ च्या स्कोअरवर दिवसाची तिसरी विकेट पडली. कर्णधार आदित्य तारे (४), सूर्यकुमार यादव (५७) आणि सिद्धेश लाड (२३) यांच्या विकेटसुद्धा दुसऱ्या सत्रातच पडल्या.
 
नायरमुळे मुंबई २०० च्या पुढे  
अभिषेक नायरने चहापानाच्या ब्रेकनंतर तळाच्या फलंदाजांची मदत घेऊन मुंबईला २०० च्या पुढे कसेबसे पोहोचवले. संधू ज्यु. आणि ठाकूर यांना रुजुल भट्टने बाद केले. विशाल दाभोळकर ३ धावा काढून धावबाद झाला. नायरने ३५ धावांची खेळी केली.