आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिंगा निवृत्तीच्या वाटेवर; मालिकेनंतर हाेणार घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- सातत्याच्या सुमार कामगिरीमुळे अाता अागामी भविष्यासंबंधीचा विचार करण्याची याेग्य वेळ अाली अाहे. यावर अाता निश्चितच ठाेस असा माेठा निर्णय घ्यावा लागणार असल्याची प्रतिक्रिया श्रीलंकन गाेलंदाज लसिथ मलिंगाने दिली. यातून त्याने भारताविरुद्ध वनडे मालिकेनंतर अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले. त्याला अापल्या घरच्या मैदानावरील या वनडे मालिकेमध्ये समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे त्याने हे संकेत दिले. याची घाेषणा टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेनंतर हाेण्याची शक्यता अाहे. अाता मालिकेतील शेवटचा अाणि पाचवा वनडे सामना ३ सप्टेंबर राेजी खेळवला जाणार अाहे.   

त्याने गत सामन्यात अापल्या वनडे करिअरमध्ये ३०० विकेट पूर्ण केल्या अाहेत. त्याने मालिकेतील चाैथ्या सामन्यात टीम इंडियाच्या विराट काेहलीला बाद केले. यासह त्याने वनडेच्या ३०० विकेटचा पल्ला यशस्वीपणे गाठला. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. पायाच्या गंभीर दुखापतीमधून सावरलेला मलिंगा हा १९ महिन्यांनंतर वनडेत खेळत अाहे. मात्र, ‘मला अद्याप  लय गवसलेला नाही. अाता मालिकेनंतर कामगिरीचा दर्जा तपासण्याची वेळ अाली अाहे. यातील परिणामानंतर याेग्य प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल,’ असे ताे म्हणाला. 
बातम्या आणखी आहेत...