- जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला क्रीडा मंत्रालयाने विदेशात प्रशिक्षणाची संधी दिली होती.
हिना सिंधूला 1 कोटी रूपये-
- नेमबाज हिना सिंधूला सरकारने टॉप्स योजनेअंतर्गत एक कोटी रुपये दिले. ती पती रौनक पंडितकडून प्रशिक्षण घेत आहे.
- ती आपल्या 10 मीटर आणि 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात फायनलमध्ये प्रवेश मिळवू शकली नाही.
- नेमबाज अभिनव बिंद्रा, गगन नारंग, मानवजित संधू आणि थाळीफेकपटू विकास गौडालाही प्रत्येकी एक-एक कोटी रुपये देण्यात आले होते.
- यातील एकही जण पदक जिंकू शकला नाही.
सायना नेहवाललाही 1 कोटी रूपये-
- बॅडमिंटन स्टार सायना नेहवाललाही एक कोटी मिळाले होते. तिचे प्रशिक्षक विमलकुमार यांना एक लाख रुपये प्रतिमहिना निधी दिला जात होता.
- सायनादेखील प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचू शकली नाही. तिला दुखापत झाल्याचे कारण सांगितले जाते.
- पी.व्ही. सिंधूला 44 लाख रूपयांची मदत दिली गेली.
धावपटू कविता राऊतला 26 लाख रूपये-
- धावपटू कविता राऊतने उटीमध्ये तीन महिन्यांच्या सरावासाठी 26 लाख रुपये मदत मिळवली.
- यातील 19 लाख रुपये म्हणजे 65 टक्के रक्कम केवळ निवासावर खर्च केली.
- टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेला 30 लाख रुपये मिळाले. प्रार्थना सानिया जोडी पहिल्याच फेरीत बाहेर झाली.
- धावपटू दुती चंदला 30 लाख रुपये देण्यात आले.
कृष्णा पुनियावर 40 लाख वाया-
- थाळीफेकपटू कृष्णा पुनिया दुखापतीमुळे दोन वर्षे खेळापासून दूर राहिली.
- त्यानंतर तिने राजस्थानमध्ये निवडणूक लढवली.
- तिला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी 40 लाखांचा निधी मिळाला.
- सीमा अंतिलला 75 लाख रुपये दिले. ती अंतिम फेरी गाठू शकली नाही.
कुटुंबीयांचीही ऑलिम्पिकवारी-
- काही खेळाडूंनी आपल्या कुटुंबीयांनाही रिओ वारी घडवली. त्यांचा सर्व खर्च सरकारने केला.
- सानिया मिर्झाची आई टेनिस संघाची व्यवस्थापक होती.
- गोल्फर अदिती अशोकचे वडील कॅडी बनले होते.
- थाळीफेकपटू सीमा पुनियाने पतीला रिओत, सपना पुनिया गोळाफेकपटू मनप्रीत कौरचे पती पोलंडमध्ये सराव शिबिरात सोबत होते.
पुढे स्लाईडद्वारे समजून घ्या, सरकारने कोणत्या खेळाडूवर किती केला खर्च...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)