आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यात आज दिल्लीत काट्याची लढत, चार गोलंदाजांवर मदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवला जाईल. भारत या मैदानावर मागच्या ११ वर्षांपासून अजेय आहे. मागच्या एकूण १३ कसोटी आणि वनडेत भारताचा पराभव झालेला नाही. यात भारताने १२ सामने जिंकले, तर एक सामना रद्द झाला.

महेंद्रसिंग धोनीचा या मैदानावर शानदार विक्रम राहिला आहे. त्याने आपल्या नेतृत्वात येथे सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची ही वनडे मालिका खूप महत्त्वपूर्ण आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी एकूण ८ वनडे सामने खेळायचे अाहेत. यातील एक सामना झाला आहे. आता उर्वरित ७ सामन्यांतील प्रदर्शनावरून भारताला आपली संघरचना करायची आहे.

टॉस ठरेल निर्णायक
दिल्लीत सायंकाळी थंडीला सुरुवात झाली आहे. याचा प्रभाव सामन्यावर पडू शकतो. कोच कुंबळेच्या मते कोटलाची खेळपट्टी खेळाडूंसाठी खूप चांगली आहे. येथे नाणेफेक निर्णायक ठरू शकते.

संघात बदल नाही
धर्मशाला येथे भारताच्या ज्या अकरा खेळाडूंनी सामना जिंकला, तेच खेळाडू नवी दिल्लीत खेळतील. भारत दुसऱ्या वनडेत त्याच खेळाडूंसह उतरेल.

चार गोलंदाजांवर मदार
भारताचा युवा गोलंदाज हार्दिक पंड्या, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल, अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांच्यावर विरोधी संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याचे आव्हान असेल.

दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अमित मिश्रा, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टाॅम लँथम, मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, ल्यूक रोंची, मिशेल सँटनर, ईश सोढी, जिम्मी निशाम, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, अँटोन डेविच, ब्रेसवेल.

कोटलावर असाही योगायोग
धोनीने कोटलाच्या याच मैदानावर अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर कसोटीचे कर्णधारपद स्वीकारले होते. आता कर्णधार म्हणून धोनीची कोच कुंबळेसोबत जोडी जमली आहे.

मोठ्या स्कोअरचे आव्हान
न्यूझीलंडच्या फलंदाजीची धुरा केन विल्यम्सन, रॉस टेलर, मार्टिन गुप्तिलसारख्या फलंदाजावर असेल. हे दिग्गज मागच्या सामन्यात मोठा स्कोअर करू शकले नाहीत.

पंड्यामुळे टीम संतुलित
^हार्दिक पंड्यामुळे आमच्या संघाचे संतुलन झाले आहे. तो वेगवान गोलंदाजी करू शकतो, शिवाय फलंदाजीतही योगदान देण्याची त्याची क्षमता आहे. तो आमच्या संघाचा मौल्यवान खेळाडू आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
- अनिल कुंबळे, कोच, टीम इंडिया.

आत्मविश्वास खचलेला नाही
^भारत दौऱ्यावर सलग चार सामने गमावल्यानंतरसुद्धा आमचा आत्मविश्वास खचलेला नाही. आम्ही दुसऱ्या वनडेत फिरोजशहा कोटला मैदानावर भारताविरुद्ध सकारात्मक विचाराने मैदानावर उतरू.
- ट्रेंट बोल्ट, गोलंदाज, न्यूझीलंड.
बातम्या आणखी आहेत...