आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो चांगला कॅप्टन होता आणि असेल, वाचा धोनीच्या निर्णयानंतर सोशल मीडिया Reactions

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - महेंद्रसिंग धोनीने 15 जानेवारीपासून इंग्लंडच्या विरोधात होणाऱ्या वनडे आणि टी20 सिरीजपूर्वी कर्णधारपद सोडले. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट जगतासह त्याच्या फॅन्सनाही धक्का बसला आहे. क्रिकेटमध्ये देशासाठी धोनीने दिलेल्या योगदानाबाबत देशभरातून लोक त्याचे आभार मानत आहेत. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका ट्वीटमध्ये म्हटले, आता मोकळेपणाने खेळ आणि जगाला दाखवून दे तुझी शक्ती. 

सोशल मीडियावरील इतर काही Reactions 
- सर्व फॉरमॅटमध्ये आम्हाला पहिल्या क्रमांकावर पोहोचवल्याबाबत धोनीचे खूप आभार - पवन संजय बागुल
- आम्ही सर्व कर्णधार म्हणून तुला मिस करू, तुझ्या कर्णधारपदाची सर कोणालाही येणार नाही - विकास कुमार
- धोनीने केवळ एका कारणामुळे कर्णधारपद सोजले आणि ते म्हणजे देशाचा विचार. तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कर्णधार होता, आणि कायम राहील. प्रतिक
- सचिन, युवीसारखे दिग्गज टीममध्ये असताना धोनीने चाहत्यांमध्ये स्वतःसाठी वेड निर्माण केले. अवघ्या स्टेडियमला धोनी-धोनी म्हणण्यास भाग पाडले. आम्ही तुला कधीही विसरणार नाही. अरुण प्रदीप

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या आणखी काही फॅन्सचे ट्वीट्स... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...