आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघी 4 षटके टाकण्यासाठी ईशांतला 2 कोटी कोण देणार? आयपीएल बोली प्रक्रियेत ईशांत, इरफान यांना कोणीच निवडले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने वेगवान गोलंदाज ईशांत शर्माची आयपीएल-१० च्या बोली प्रक्रियेत निवड का झाली नाही, यावर कटाक्ष टाकला आहे. गंभीर म्हणाला, “ईशांतला ४ षटके टाकण्यासाठी २ कोटी रुपये कोण देणार? त्याची ब्रेस प्राइस कमी ठेवायला हवी होती.’ एका चॅनलशी बोलताना गंभीर म्हणाला, “स्टोक्ससारखा खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींत दमदार प्रदर्शन करतो, तर ईशांत केवळ गोलंदाज आहे.
 
 
 ईशांतला टी-२० चा गोलंदाज मानले जात नाही. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने अद्याप काहीच कमाल कामगिरी केलेली नाही. ईशांत चार वर्षांपासून भारताच्या टी-२० संघातून बाहेर आहे. अशात त्याला कोण घेणार?’  
 
इरफान ठरला अनलकी : ईशांतप्रमाणे इरफानही बोलीत विकला गेला नाही. मागच्या सत्रात इरफानने पुण्याकडून केवळ एक सामना खेळला. तो सत्राच्या अखेरपर्यंत दुखापतीने त्रस्त होता. इरफानचे नाव अष्टपैलू खेळाडूंत येते. त्याची निवड अपेक्षित होती. 
 
यामुळे इरफान पठाणची झाली निवड नाही  
- नेहमी फिटनेसमुळे त्रस्त. फॉर्म, फिटनेसमुळे तो मागच्या सत्रात बरेच सामने खेळू शकला नाही.  
- टीम इंडियातूनही बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. याचा फटकाही त्याला बसला.  
- इरफानची बेस प्राइस केवळ ५० लाख रुपये होती. मात्र, सलग दुखापती आणि फॉर्मात नसणे, हे त्याच्या अडचणीचे ठरले.  
- नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली ट्राॅफीत त्याने १७च्या सरासरीने ४ सामन्यांत ५ गडी बाद केले होते. 
 
ईशांतची निवड न होण्याची ही कारणे  
- २ कोटी रुपये बेस प्राइस खूप अधिक होती. यामुळे संघांनी त्याच्यावर बोली लावली नाही. २ कोटी बेस प्राइस असलेल्या खेळाडूंत अष्टपैलू अधिक होते. ईशांत केवळ गोलंदाज आहे.
-आयपीएल-९ मध्ये ईशांतने ४ सामन्यांत ३ गडी बाद केले. त्याला पुणे संघाने ३.८ कोटी रुपयांत खरेदी केले होते. 
- ईशांतकडे टी-२० सामन्यांचा फार अनुभव नाही. केवळ १४ सामने खेळले आहेत. कसोटीचा खेळाडू म्हणून ओळख आहे.
 
कसोटी क्रिकेट तोंडघशी पडले : केविन पीटरसन  
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला इंडियन प्रीमियर लीगसाठी बोलीत १२ कोटी रुपये मिळाल्याने माजी खेळाडू केविन पीटरसनने टीका केली आहे. मिल्सला १२ कोटी रुपये मिळाल्याने कसोटी क्रिकेट तोंडघशी पडले आहे, अशी बोचरी टीका त्याने केली. टी-२० क्रिकेटमध्ये इतके पेसै मिळतील तर मग कसोटीत कोण खेळेल. अशाने कसोटीची लोकप्रियता घटेल, असे पीटरसन म्हणाला.  बोलीत मागच्या वर्षीची उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मिल्सला १२ कोटींत, तर पुणे संघाने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला १४.५ कोटींत खरेदी केले.
 
आयपीएल-१० च्या लोगोचे अनावरण 
आयपीएल-१० चा विशेष लोगो जाहीर करण्यात आला  आहे. जगभरात प्रसिद्ध झालेल्या या टी-२० क्रिकेटचा दहा वर्षांतील प्रवास या लोगोत दिसून येतो. नव्या लोगोत १० अक्षरांत एक फलंदाज खेळताना दाखवण्यात आले आहे. ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेची ट्रॉॅफी विविध शहरांतून फिरणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी फॅन पार्कची व्यवस्था करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...