आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाफ्रिकेच्या हाशिम अामलाच्या वेगवान सात हजार धावा पूर्ण; काेहलीवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - दक्षिण अाफ्रिकेच्या सुपरस्टार फलंदाज हाशिम अामलाने साेमवारी वनडेमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने वनडेमध्ये सर्वाधिक वेगाने सात हजार धावा पूर्ण करण्याचा यशस्वीपणे पल्ला गाठला. त्याने इंग्लंडविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या अाणि शेवटच्या वनडे सामन्यात हे यश संपादन केले. त्याने या सामन्यामध्ये ५५ धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे त्याला ७ हजार धावा पूर्ण करता अाल्या.   

हा पराक्रम करताना त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीलाही पिछाडीवर टाकले. अामलाच्या नावे वनडेत कमी डावात २०००, ३०००, ४००० अाणि ५०००  धावा पूर्ण करण्याचाही विक्रम नाेंद अाहे.याशिवाय त्याने काेहलीच्या वेगवान ६ हजार धावा पूर्ण करण्याचाही विक्रम माेडला हाेता. काेहलीने अामलाच्या तुलनेत सहा वर्षाअाधी वनडेमध्ये पदार्पण केले.मात्र, हािशमने अल्पवाधीत यश मिळवले. 
 
कमी वनडेत सात हजार 
अाफ्रिकन फलंदाज हाशिम अामलाने कमी वनडेमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या अाहेत. त्याने १५० डावांत हे यश खेचून अाणले. काेहलीच्या नावे वनडेच्या १६१ डावांमध्ये सात हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाेंद हाेता. मात्र, इंग्लंडविरुद्ध सामन्यादरम्यान २३ धावा काढताना अामलाने काेहलीला पिछाडीवर टाकले.  
बातम्या आणखी आहेत...