आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया सहज विजयी, 3 सामन्यांची मालिका श्रीलंकेने 2-1 ने जिंकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ४१ धावांनी विजय मिळवून यजमान ऑस्ट्रेलियाने अब्रू राखली. या पराभवानंतरही श्रीलंकेने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने आपल्या नावे केली. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात लंकेचा डाव १८ षटकांत सर्वबाद १४६ धावांत आटोपला.  
 
धावांचा पाठलाग करताना लंकेकडून मुनाविराने सर्वाधिक ३७ धावा आणि मधल्या फळीचा फलंदाज सिरिवर्धनेने ३५ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केली. मुनाविराने २५ चेंडूंत २ षटकार, ३ चौकारांसह ३७ धावा ठोकल्या. थरंगाने १४, जीवन मेंडिसने १४, गुणरत्नेने ४, कापुगेदराने ७ धावा काढल्या.  
 
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने कर्णधार अॅरोन फिंच (५३) आणि क्लिंगरच्या (६२) अर्धशतकाच्या बळावर १८७ धावांचा स्कोअर उभा केला. फिंचने ३२ चेंडूंत ३ षटकार, ५ चौकार मारले, तर क्लिंगरने १ षटकार आणि ६ चौकारांचा पाऊस पाडला.
 
 
बातम्या आणखी आहेत...