आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक कुंबळेंची हाेती साडेसात काेटी मानधनाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अापल्या कराराच्या पुनर्गठनसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला १९ पानांचा प्रस्ताव मांडला हाेता. यामध्ये कुंबळेंनी चक्क वाढीव मानधनाची मागणी केली हाेती. मुख्य प्रशिक्षकाची कमाई ही कर्णधाराच्या मानधनापेक्षा ६० टक्के अधिक असावी,अशी त्यांची मागणी हाेती. 

त्यामुळे त्यांनी अापल्याला साडेसहा काेटींएेवजी वाढवून साडेसात काेटींचे मानधन देण्याची मागणी केली हाेती. गत मे महिन्यात त्यांनी हा प्रस्ताव बीसीसीअायसमाेर ठेवला हाेता. याशिवाय त्यांनी सहायक स्टाफमध्ये संजय बांगरचे वेतन अडीच काेटी, अार. श्रीधरला १ कसाेटी ७५ लाख रुपये देण्याची मागणी केली हाेती. मात्र, यावर काेणत्याही प्रकारची प्रतिक्रिया बीसीसीअायने दिली नाही.  दरम्यान, मंडळाने केवळ विंडीज दाैऱ्यापर्यंत कुंबळेंना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, कुंबळेंनी हे मान्य न करता राजीनामा दिला. 
बातम्या आणखी आहेत...