आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने 12 महिन्यांत खेळले फक्त 11 वनडे, जगातील अाठ टीमच्या तुलनेत सर्वात कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची डिनर पार्टी - Divya Marathi
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची डिनर पार्टी
नवी दिल्ली - गत वर्ष हे भारतीय संघाचे सर्वाधिक कसाेटी सामने खेळण्यामध्येच गेले. याशिवाय टीम इंडियाचे खेळाडू दाेन महिने अायपीएलमध्ये व्यस्त राहिले. परिणामी टीम इंडिया ही चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये सहभागी अाठ टीमच्या तुलनेत सर्वाधिक कमी वनडे खेळणारा संघ अाहे. भारताने मागील १२ महिन्यांमध्ये केवळ ११ वनडे सामने खेळले अाहेत. १ जून २०१६ ते २७ मे २०१७ पर्यंतच्या सामन्यांचा यामध्ये समावेश अाहे. यातील अाठ वनडे सामन्यांत टीम इंडियाने विजयश्री खेचून अाणली. दुसरीकडे तीन वनडे सामन्यांत भारतीय संघाला पराभवाला सामाेरे जावे लागले.  

चॅम्पियन्स ट्राॅफीमधील सर्वात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेश टीमनेही या वर्षभरामध्ये सर्वाधिक वनडे सामने खेळले. यामध्ये १६ सामन्यांचा समावेश अाहे. यातील ६ वनडेत बांगलादेश संघ विजयी झाला. तसेच अाठ सामन्यांत बांगलादेशचे खेळाडू अपयशी ठरले.   
अाॅस्ट्रेलिया टीमने गत वर्षभरामध्ये सर्वाधिक २८ वनडे खेळण्याचा विक्रम केला अाहे. १६ सामन्यांत अाॅस्ट्रेलियन टीम विजयाची मानकरी ठरली. तसेच उर्वरित ११ सामने गमावले.श्रीलंकेने २५ वनडे (७ विजय), अाफ्रिकेने २४ वनडे ( १६ विजय), इंग्लंड २३ वनडे (१७ विजय), न्यूझीलंड २२ वनडे (१२ विजय) व पाकिस्तानने १७ वनडे (८ विजय) खेळले अाहेत. 
 
वाॅर्नर सर्वाधिक यशस्वी फलंदाज
अाॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वाॅर्नर हा गतवर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने २२ वनडेमध्ये एकूण १४०९ धावा काढल्या. यामध्ये अाठ शतकांचा समावेश अाहे. १०८२ धावांसह दक्षिण अाफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस दुसऱ्या स्थानावर अाहे. अाफ्रिकेच्या क्विंटन डिकाॅक (१०५७) व अाॅस्ट्रेलियाच्या स्मिथचा (१०१९) अव्वल चार फलंदाजांमध्ये समावेश अाहे. गत सत्रामध्ये १ हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्यांमध्ये भारताचा एकही फलंदाज नाही.
 
रशीद खानच्या सर्वाधिक विकेट
सत्रात वनडेमध्ये सर्वाधिक विकेटचा पराक्रम अफगाणिस्तानच्या रशीद खानच्या नावे अाहे. त्याने १९ सामन्यांत ४२ विकेट घेतल्या.अफगाण टीमने यातील बरेच काही सामने दुबळ्या अायर्लंडविरुद्ध खेळले अाहेत.  या यादीमध्ये अाॅस्ट्रेलियन वेगवान गाेलंदाज स्टार्क (३९ बळी) दुसऱ्या स्थानावर अाहे.
 
राेहित खेळणार, जखमी युवीचा सहभाग अनिश्चित!
लंडन - अायसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये टीम इंडिया अापल्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळणार अाहे. या सराव सामन्यामध्ये भारताचा युवा फलंदाज राेहित शर्मा अॅक्शनमध्ये असेल. ताे पहिल्या सराव सामन्यात खेळू शकला नाही. 
अाता दुसऱ्या सराव सामन्यामध्ये जखमी युवराज सिंगचा सहभाग अद्याप अनिश्चित मानला जात अाहे. कारण, ताे अद्यापही अाजारातून सावरलेला नाही. दुसऱ्या सामन्यामध्ये राेहित शर्मा, शिखर धवन या सलामीच्या जाेडीला साेबत सराव करण्याची संधी मिळणार अाहे. त्यांना मुख्य फेरीत कायम ठेवण्याची शक्यता अाहे.  पहिल्या सराव सामन्यात जसप्रीत बुमराह अाणि हार्दिक अापली चमक दाखवू शकले नाहीत. मात्र, अाता दुसऱ्या सामन्यात या दाेघांवर सर्वांची नजर असेल. 
 
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची डिनर पार्टी
लंडन - रविवारी पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय संपादन केल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार डिनर पार्टी केली. यामध्ये टीमचे सर्वच खेळाडू सहभागी झाले हाेते. त्यामुळे त्यांनी धमाल करून या विजयाचा जल्लाेष केला. काेहलीच्या नेतृत्वात खेळाडू चार जूनपासून माेहिमेला दमदार सुरुवात करण्यास उत्सुक अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...