आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी क्रमवारी : अश्विन दुसऱ्या स्थानावर, श्रीलंकेच्या हेराथवर कुरघाेडी करून; अश्विनची प्रगती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - यजमान श्रीलंकेविरुद्धच्या सलामी कसाेटीतील उल्लेखनीय कामगिरीचा टीम इंडियाच्या खेळाडूंना माेठा फायदा झाला. याच कामगिरीच्या बळावर भारताने मालिकेत विजयी सलामी दिली. दुसरीकडे भारताच्या खेळाडूंनी अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीत माेठी प्रगती साधली अाहे. भारताचा फिरकीपटू अार.अश्विनने गाेलंदाजीच्या क्रमवारीत प्रगती साधली. त्याने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. यादरम्यान त्याने श्रीलंकेच्या रंगना हेराथला पिछाडीवर टाकून हे स्थान गाठले. अापल्या करिअरमधील ५० व्या कसाेटीतील उल्लेखनीय कामगिरीचा त्याला माेठा फायदा झाला. त्याने या गॅले कसाेटीत ४ विकेट घेतल्या.  त्याची ही करिअरमधील ५० वी कसाेटी हाेती. त्यापाठाेपाठ या कसाेटीत जडेजा चमकला. त्याने सर्वाधिक सहा विकेट घेण्याचा पराक्रमही याच कसाेटीत गाजवला. यामुळे त्याला क्रमवारीतील  अव्वल स्थान कायम ठेवता अाले.   
 
 अायसीसीने मंगळवारी कसाेटी क्रमवारी जाहीर केली. अश्विनने कुरघाेडी केेल्याने श्रीलंकेच्या हेराथची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. हेराथ अाणि जेम्स अँडरसन हे दाेघे संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर अाहेत.  जाेश हेझलवुडने पाचवे अाणि कागिसाे रबाडाने सहावे स्थान कायम ठेवले. डेल स्टेन हा सातव्या स्थानावर अाहे.   
 
स्टाेक्सची प्रगती : अाॅलराउंडरच्या रँकिंगमध्ये इंग्लंडच्या बेन स्टाेक्सने प्रगती साधली. त्याने दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीतील अष्टपैलू कामगिरीच्या बळावर क्रमवारीत पाचवे स्थान गाठले.  फलंदाजीत इंग्लंडचा कर्णधार ज्याे रुटने दुसरे स्थान कायम ठेवले अाहे.  न्यूझीलंड कर्णधार विल्यम्सन तिसऱ्या स्थानी अाहे. वाॅर्नरने सातवे व काॅकने अाठवे स्थान राखून ठेवले अाहे.  
 
टीम इंडियाचा कसून सराव 
 
गुरुवारपासून सुरू हाेणाऱ्या दुसऱ्या कसाेटीसाठी टीम इंडियाने मंगळवारी कसून सराव केला. काेलंबाे येथे दुसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेणार अाहे. यासाठी भारताचे खेळाडू कसून सराव करत अाहेत. कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी सराव केला. काही काळ त्यांनी फुटबाॅलचा अानंद लुटला. भारताने सलामी कसाेटी जिंकून मालिकेत १-० ने अाघाडी घेतली अाहे.   
चेतेश्वर पुजारा चाैथ्या स्थानावर 
श्रीलंकेविरुद्ध कसाेटीत शानदार शतकाच्या बळावर चेतेश्वर पुजाराने फलंदाजी क्रमवारीतील अापले स्थान कायम ठेवले. त्याने क्रमवारीत चाैथे स्थान कायम ठेवले. त्यापाठाेपाठ टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली हा पाचव्या स्थानावर अाहे. या क्रमवारीत अाॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा अव्वलस्थानी कायम अाहे.
 
अश्विन सरस 
अायसीसीच्या अाॅलराउंडर यादीतही भारताचे रवींद्र जडेजा अाणि अार.अश्विन सरस ठरले अाहेत. त्यांनी यामध्ये अनुक्रमे दुसरा अाणि तिसरे स्थान गाठले अाहे. या क्रमवारीत बांगलादेशचा शकीब अल हसन हा अव्वल स्थानावर अाहे. अाता जडेजाला श्रीलंकेविरुद्ध अागामी दाेन कसाेटींत अष्टपैलू कामगिरीची माेठी संधी अाहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, थिरीमानेला वर्षभरानंतर रिकाॅल...
बातम्या आणखी आहेत...