आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया विक्रमाच्या उंबरठ्यावर; श्रीलंकेची अाजपासून कसाेटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल- काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अाता यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप देऊन सर्वाधिक विजयासह अनेक विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे. त्यामुळे यजमानांची अापल्या घरच्या मैदानावर शेवट गाेड करण्यासाठी चांगलीच कसाेटी अाहे. भारत अाणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला शनिवारपासून सुरुवात हाेईल. भारताने सलगच्या दाेन विजयाच्या बळावर तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेतली अाहे. यासह अाता तिसऱ्या कसाेटीतील विजयातून भारताला विदेशी खेळपट्टीवर तीन कसाेटी जिंकण्याच्या विक्रमाला गवसणी घालता येईल. यापूर्वी १९६८ मध्ये भारताच्या नावे या कामगिरीची नाेंद अाहे. तसेच ८५ वर्षांनंतर प्रथमच विदेशी खेळपट्टीवर तीन वा अधिक कसाेटी सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा सुपडासाफ करण्याची भारताला संधी अाहे. अाता या कामगिरीपासून टीम इंडिया एका पावलावर अाहे.  

कुलदीपला संधी
रवींद्र जडेच्या अनुपस्थितीमध्ये अाता तिसऱ्या कसाेटीसाठी चायनामॅन कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता अाहे. त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली अाहे. त्याला अाॅलराउंडर जडेजाच्या जागी संघाकडून उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी अाहे. याशिवाय अक्षर पटेलही संघात सहभागी अाहे. त्यालाही पदार्पणाची अाशा अाहे.

चामिरा, गमागेला संधी
यजमान श्रीलंकेने अापल्या दाेन युवा खेळाडूंना संघात सहभागी केले अाहे. यामध्ये दुषमंथा चामिरा अाणि २० वर्षीय वेगवान गाेलंदाज लाहिरू गमागेचा समावेश अाहे. त्यांच्याकडून टीमला माेठ्या खेळीची अाशा अाहे. लाहिरू गमागेला पहिल्यांदा यजमानांच्या कसाेटी संघात स्थान मिळाले. त्याने अातापर्यंत ८१ प्रथमश्रेणी सामन्यांत ३० च्या सरासरीने २२० विकेट घेतल्या अाहेत. त्याने गत २०१४ मध्ये अांतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण केले. अाता त्याला कसाेटीत पदार्पण करण्याची संधी अाहे. 

संभाव्य संघ   
भारत :
विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे,  अार. अश्विन, राेहित शर्मा, वृद्धिमान साहा, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक, भुवनेश्वर, माे. शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, अक्षर पटेल.  

श्रीलंका : दिनेश चांदिमल  (कर्णधार), उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस, मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, धनंजया डिसिल्वा, डिकवेला, दिलरूवान परेरा, चामिरा, लाहिरू गामगे, लक्षण सदाकन, मलिंडा पुष्पकुमारा. 
बातम्या आणखी आहेत...