आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना : बांगलादेशचा 84 धावांत धुव्वा; टीम इंडिया 240 धावांनी विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धशतकी खेळीदरम्यान फटका मारताना भारतीय संघाचा दिनेश कार्तिक. - Divya Marathi
अर्धशतकी खेळीदरम्यान फटका मारताना भारतीय संघाचा दिनेश कार्तिक.
लंडन - दिनेश कार्तिक (९४), हार्दिक (८०), धवनच्या (६०) झंझावाती फलंदाजीनंतर भुवनेश्वर (३/१३) व उमेश यादवने (३/१६) केलेल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्राॅफीचा सराव सामना जिंकला. भारताने मंगळवारी बांगलादेशवर २३.५ षटकांत २४० धावांनी शानदार विजय संपादन केला.  
 
अाता मुख्य फेरीत भारताचा पहिला सामना ४ जून राेजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी हाेणार अाहे.   
 
शेवटच्या क्षणी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी हाेण्याच्या मिळालेल्या संधीचे साेने करताना दिनेश कार्तिकने (९४) टीम इंडियाकडून सराव सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठाेकले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने विजयासाठी बांगलादेशसमाेर ३२५ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बांगलादेशने अवघ्या ८४ धावांमध्ये गाशा गुंडाळला.  
 प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर राेहित शर्मा (१) हा झटपट बाद झाला. त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यापाठाेपाठ अजिंक्य रहाणे ११ धावांची खेळी करून तंबूत परतला.   
 
कार्तिक, हार्दिकचा झंझावात : भारताकडून दिनेश कार्तिक अाणि हार्दिकने झंझावाती खेळी केली. दरम्यान, कार्तिकने ७७ चेंडूंत ९४ धावा काढल्या. यात अाठ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. हार्दिकने नाबाद ८० धावांची खेळी केली. 
 
धवन-कार्तिकची शतकी भागीदारी 
शिखर धवन अाणि दिनेश कार्तिकने दाेन विकेटमुळे संकटात सापडलेल्या भारताचा डाव सावरला. त्यांनी बांगलादेशच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. दरम्यान, धवनने अर्धशतकाचे याेगदान दिले. त्याने ६७ चेंडूंचा सामना करताना सात चाैकारांच्या अाधारे ६० धावांची खेळी केली. 
 
बातम्या आणखी आहेत...