आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदिग्ध गाेलंदाजी अॅक्शन शाेधणारे तंत्रज्ञान! अवघ्या सेकंदामध्ये मिळणार माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- संदिग्ध गाेलंदाजी अॅक्शनमध्ये अाजतागायत अनेक गाेलंदाजांना बंदीच्या कारवाईला सामाेरे जावे लागले अाणि जावे लागत अाहे. त्यामुळे अनेक प्रतिभावंत गाेलंदाजांची कारकीर्द धाेक्यात अाली अाहे. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनलाही याचा फटका बसला. बाॅल चकिंगला पकडणे साेपे नाही. याचा अनेक वेळा सामन्यावर परिणाम होताे. मात्र, यावर अाता तंत्रज्ञानातून प्रबळ अाणि मजबूत असा उपाय शाेधण्यात अाला अाहे. 
 
पाकिस्तानच्या तीन युवा अभियंत्यांनी चेंडूला चकिंग करणाऱ्या तंत्रज्ञानाला विकसित केले अाहे. त्यामुळे संदिग्ध गाेलंदाजीची अॅक्शन तत्काळ पकडण्यात येणार अाहे. याला अवघ्या सेकंदाचा कालावधी लागेल. त्यामुळे गाेलंदाजीची कृती ही याेग्य अाहे की अयाेग्य हेदेखील यातून सिद्ध हाेईल.   

‘क्रिकफ्लेक्स’ नावाचे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात अाले अाहे. हे डिव्हाइस घातल्यानंतर गाेलंदाजीची कृती स्पष्ट हाेईल. लाहाेर येथे क्रिकेट क्लबच्या लीगदरम्यान या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात अाली. या तंत्रज्ञानाला अायसीसीची मान्यता मिळाल्यास क्रिकेटमध्ये माेठा सकारात्मक असा बदल हाेईल, असा विश्वास या युवा अभियंत्यांना अाहे.
   
या अभियंत्यांनी डाय फिट मटेरियलची जेनेरिक स्लीव्ह तयार केली अाहे. यामध्ये नाण्याच्या अाकाराचे डिव्हाइस बसवण्यात अाले अाहे. यामध्ये गाेलंदाजीची अॅक्शन स्पष्ट करणारे सेन्सर बसवण्यात अाले अाहे. यासाठी एका अॅपची मदत घेण्यात अाली. या अॅपच्या अाधारे गाेलंदाजीच्या अॅक्शनची परिपूर्ण माहिती स्पष्ट हाेईल. या सेन्सरच्या अाधारे गाेलंदाजांच्या प्रत्येक कृतीचा लेखाजाेखा स्पष्ट केला जाताे. चुकीच्या पद्धतीने गाेलंदाजी करत असल्याचे स्पष्ट झाल्यास त्या खेळाडूंवर कारवाई केली जाते.  
 
क्रिकफ्लेक्सचे कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अहमदने या तंत्रज्ञानावर अापली प्रतिक्रिया दिली. ‘हे तंत्रज्ञान अधिक स्वस्त अाणि तत्काळ परिणाम देणारे अाहे. पंचांना बाॅल चकिंगबाबतचा निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागताे. यासाठीच्या चाचणीचा अहवाल येण्यासाठीही बराच कालावधी लागताे. याशिवाय ही चाचणी अधिक खर्चिक अाहे. मात्र, युवा अभियंत्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाची किंमत अवघी २० हजार रुपये अाहे. त्यापेक्षाही अधिक कमी किमतीमध्ये हे तंत्रज्ञान मिळू शकते. यासाठी लवकरच पेटंट तयार करण्यात येणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले.
 
 
बातम्या आणखी आहेत...